Join us   

स्क्रिनवर सतत काम करून डोळ्यांवर ताण येतो? २०-२०-२० चा फॉर्म्युला वापरा- डोळ्यांना आराम मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 3:28 PM

1 / 7
हल्ली बऱ्याच जणांना सतत कम्प्युटरवर, लॅपटॉपवर काम करावे लागते.
2 / 7
बऱ्याच विद्यार्थ्यांचे तर लेक्चर्सही ऑनलाईन होतात. त्यामुळे त्यांनाही ४ते ५ तास सलग स्क्रिनसमोर बसावेच लागते.
3 / 7
अशावेळी डोळ्यांवर ताण येतो आणि ते दुखू लागतात. म्हणूनच डोळ्यांचा थकवा, ताण घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा.
4 / 7
हा उपाय sarvakaahi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. तसेच बरेच नेत्ररोगतज्ज्ञदेखील हा उपाय सुचवतात.
5 / 7
हा उपाय करण्यासाठी तुमच्या कामातून दर २० मिनिटाला ब्रेक घ्या आणि खिडकीच्या बाहेर साधारण २० फूट अंतरावर जे काय असेल त्याकडे २० सेकंदासाठी नजर लावून ठेवा. म्हणजेच २० फूट किंवा त्यापेक्षा जास्त दूरचे बघण्याचा प्रयत्न करा. (The 20-20-20 Rule of Eye Care)
6 / 7
यामध्ये तुम्ही हिरवी झाडी किंवा आकाश असं काही बघितलं तर जास्त चांगलं. यामुळे डोळ्यांचा ताण आणखी कमी होण्यास मदत होते.
7 / 7
हा उपाय केल्याने डोळे निश्चितच रिलॅक्स होण्यास मदत होईल.
टॅग्स : आरोग्यडोळ्यांची निगा