८ पदार्थ खा - उडालेली झोप, सतत थकवा आणि चिडचिड जादू झाल्यासारखे प्रॉब्लम होतील गायब By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 11:26 AM 1 / 11प्रथिने (Protien), कॅल्शियम (Calcium) आणि लोहाप्रमाणे (Iron), झिंक (Zinc) आणि मॅग्नेशियम (Magnesium) देखील तितकेच गरजेचं आहे. परंतु, बऱ्याचदा आपण असे अनेक पदार्थ खाणं टाळतो (Healthy Foods), ज्यात पौष्टीक घटकेचा साठा असतो. झिंक आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते(The Best Foods That Are High in Magnesium and Zinc).2 / 11डॉ. प्रियांका सेहरावत यांच्या मते शरीराला झिंकयुक्त पदार्थांची गरज लागते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी झिंकयुक्त पदार्थ खायला हवे. यासह पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी आणि त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी झिंकयुक्त पदार्थ मदत करते. 3 / 11तर, मॅग्नेशियमची कमतरता टाळण्यासाठी, आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांनी काही पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, पालक, शेंगा, नट, बिया आणि विविध प्रकारचे धान्य खायला हवे. 4 / 11बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते. भोपळा, तीळ, अळशीच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते. या प्रकारच्या बिया आपण सॅलडमध्ये किंवा त्याचे लाडू करून खाऊ शकता. 5 / 11पालक केवळ चवीसाठी नसून, त्यात अनेक पौष्टीक घटक आढळतात. मुख्य म्हणजे पालक हे मॅग्नेशियमचे उत्तम स्त्रोत आहे. परंतु, पालक खाताना जास्त शिजवू नका.6 / 11दुग्धजन्य पदार्थांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते. दूध, चीज आणि दहीसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम व्यतिरिक्त झिंकचे प्रमाण जास्त असते. 7 / 11पोटॅशियमव्यतिरिक्त केळीमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये असलेले हे पोषक तत्व शरीराच्या कार्याला चालना देते.8 / 11ड्रायफ्रुट्समध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. शेंगदाणे, काजू, बदामामध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. ज्याचा फायदा निश्चितच शरीरातील प्रत्येक अवयवांना होतो.9 / 11मुठभर बदाम खाल्ल्याने जवळपास सर्व पोषक तत्वे मिळतात. बदाम हा मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. अधिक पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी रात्री भिजवलेले बदाम खा. 10 / 11डार्क चॉकलेट खाण्याचेही अनेक फायदे आहेत. यात अँटिऑक्सिडंट्ससह झिंक असते. झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आपण डार्क चॉकलेट खाऊ शकता. 11 / 11काजू हे मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे. मूठभर काजू खाल्ल्याने केवळ मॅग्नेशियमच नाही तर प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वेही मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications