Join us

पॅड आणि कप? मासिक पाळीत वापरण्याचे याहूनही चांगले पर्याय उपलब्ध, पाहा कोणते जास्त चांगले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 20:32 IST

1 / 9
पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना फार त्रास होतो. काहींचे पोट प्रचंड दुखते तर काहींची पाठ दुखते. तसेच प्रत्येकीला होणारे ब्लिडींगही वेगवेगळ्या प्रमाणात असते.
2 / 9
काहींना दोन ते चार दिवसच ब्लिडींग होते तर काहींना सहा ते सात दिवसांपर्यंत हा त्रास होतो. प्रत्येक जण स्वत:च्या सोयीनुसार पाळीसाठी काय वापरायचे हे ठरवत असते. पाहा कोणत्या प्रकारच्या गोष्टी पाळीसाठी वापरता येतात.
3 / 9
सगळ्यात कॉमन वापरला जाणार प्रकार म्हणजे सॅनिटरी पॅड. सगळ्याच मेडीकल्समध्ये ते आरामात उपलब्ध होते. वेगवेगळ्या साईजमध्ये मिळते.
4 / 9
आजकाल टॅम्पॉन वापरणाऱ्या ही अनेक महिला आहेत. ते वापरण्याची पद्धत पाहून अनेकांना भीती वाटते. मात्र वापरणाऱ्यांकडून येणारा प्रतिसाद फार सकारात्मक असतो. WHO ने सांगितल्याप्रमाणे, टॅम्पॉन वापरण्यात काहीच धोका नाही.
5 / 9
मेंस्ट्रुअल कप हा प्रकारही अनेक जणी वापरतात. हा प्रकार वन टाईम यूजचा नसून पुन्हा वापरता येतो. अनेक मेडीकल साईट्सवर हा कप कसा वापरायचा याबद्दल माहिती उपलब्ध आहे.
6 / 9
सध्या अगदीच चांगला पर्याय कोणता असेल तर तो म्हणजे पिरीएड पॅन्टीज. डायपरसारखाच हा प्रकार आहे मात्र तेवढा जाड नाही. अगदी कम्फर्टेबल असतो. पॅन्टी पॅडपेक्षा जास्त वेळ टिकते.
7 / 9
सध्या कॉटन पॅडही फार लोकप्रिय आहे. हे पॅड कापडापासून तयार केलेले असते. त्याला बटणही असते.
8 / 9
रियुजेबल पॅड्स हा प्रकार फार वादात्मक आहे. वापरणाऱ्यांची संख्याही अगदी कमी आहे. पुन्हा तेच पॅड वापरणे चांगले आहे का नाही असा प्रश्न उद्भवतो.
9 / 9
पिरीएड अन्डर्वेअर फार महाग असते. तसेच फार जणींना या प्रकाराबद्दल माहिती नाही. वापरणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे.
टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यआरोग्यमहिलाहेल्थ टिप्स