अचानक छातीत दुखण्याची 'ही ' कारणे, घाबरु नका - हा हार्ट अटॅक नाही तर..
Updated:February 4, 2025 20:59 IST2025-02-04T20:49:52+5:302025-02-04T20:59:56+5:30
These are the causes of sudden chest pain, don't panic - it's not a heart attack : अचानक छातीत कळ येण्याची कारणे जाणून घ्या.

फक्त हृदय विकाराने नाही, तर इतर कारणांनीही छातीत दुखू शकते.
मध्येच कधीतरी अचानक छातीत दुखायला लागते. आपण घाबरून जातो. पण छातीत दुखण्यासाठी ही कारणेही असू शकतात.
छातीत अचानक जळजळायला लागते. अपचनामुळे असे होऊ शकते. शरीरात गॅस भरल्याने छाती दुखते .
स्नायू ताणले गेल्यानेही छातीत दुखते. छाती जवळील स्नायूंवर ताण पडल्याने किंवा लचक भरल्याने छातीत दुखते.
घाबरल्याने छातीत दुखते. अशावेळी लांब श्वास घ्या. आणि शांत व्हा.
अति विचाराने छातीत कळ येऊ शकते. तुम्ही जास्त स्ट्रेस घेतलात तरी छाती दुखते.
हृदयाच्या दिशेने जास्तीचा रक्त प्रवाह झाल्यात छातीत कळ येते. ताणतणावामुळे किंवा थकव्यामुळे असे होते.
धावपळ केल्याने दम लागतो. अति दम लागल्यानेही छातीत दुखते.
पण जर घाम फुटायला लागला, चक्कर यायला लागली, शरीरभर त्रास जाणवायला लागला, तर मात्र लगेच दवाखाना गाठा.
हृदय विकाराचा झटका आल्यावर लागलीच उपाय करणे फार गरजेचे असते.