उन्हाळ्यात महिला पडतात जास्त आजारी, ६ गोष्टी या उन्हाळ्यात कराच! उन्हाचा त्रास कमी
Updated:February 26, 2025 18:55 IST2025-02-26T18:48:14+5:302025-02-26T18:55:41+5:30
this summer be careful, do these 6 things : उन्हाळ्यात महिलांना होतो जास्त त्रास. जाणून घ्या काय कराल.

या वर्षीचा उन्हाळा फारच गरम असणार आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे. महिलांसाठी जास्त त्रासदायक ठरेल, असेही अनेक माध्यमांवरून प्रसारित केले जात आहे.
तरी थोडी फार काळजी घेऊन आपण सन स्ट्रोक सारखे प्रकार घडणार नाहीत यासाठी सावध राहू शकतो.
या काही गोष्टी लक्षात ठेवा. उन्हाळ्याचा त्रास कमी जाणवेल. तसेच जास्त उकडले तरी शरीराला त्याचा त्रास नाही होणार.
१. सगळ्यात सामान्य पण महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पाणी पित राहणे. उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रचंड पाण्याची गरज असते. शरीर डिहायड्रेट होत राहते. त्याला सतत पाणी लागते.
२. भरपूर फळे खा. फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो. पोटाला आधार मिळतो. शरीरही हायड्रेटेड राहते.
३. डोक्यावर पातळ कॉटनची ओढणी घ्या. उन्हाने डोके गरम होते. त्यामुळे चक्कर येते. डोकं गरम होऊ देऊ नका.
४. सतत चेहऱ्यावर व टाळूवर पाणी शिंपडत राहा. डोकं किंवा चेहरा कोरडा पडू देऊ नका.
५. शरीरासाठी मिळणाऱ्या योग्य त्या क्रिमचा वापर करा. मॉइश्चरायझर लावा. त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या.
६. अति उष्ण अन्न पदार्थ खाणे टाळा. बाहेरची उष्णता आधीच जास्त असते. मग शरीर आतूनही उष्ण झाल्यावर विविध आजार होतात.
७. उकडतं आहे म्हणून सतत थंड पाणी पिऊ नका. माठातील पाणी प्या. वाळ्याचे पाणी प्या. फ्रिजमधील पाण्यामुळे आजारपण येते.