दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही? ३ मिलिट्री टिक्स, ढाराढूर झोपाल

Published:February 26, 2023 01:43 PM2023-02-26T13:43:55+5:302023-02-26T13:51:20+5:30

Tips for Falling Asleep Fast : अनेक वेळा आपण झोपल्याबरोबर इतर गोष्टींचा विचार करू लागतो. तुम्हीही हे करत असाल तर आतापासून तुमची ही सवय बदला.

दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही? ३ मिलिट्री टिक्स, ढाराढूर झोपाल

दिवसभर काम केल्यानंतर रात्री लवकर झोप येत नाही असं अनेकांच्या बाबतीत होतं. रात्री लवकर झोप येण्यासाठी काही सोपे उपाय माहीत करून घेतले तर तुम्हाला काही मिनिटातच शांत झोप येईल आणि जास्त वेळही जाणार नाही. जर रात्री नीट झोप आली नाही तर दिवसभर उत्साही वाटत नाही, जांभया येतात किंवा पूर्ण दिवच कंटाळवाणा वाटतो. (How to get sleep faster)

दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही? ३ मिलिट्री टिक्स, ढाराढूर झोपाल

निरोगी राहण्यासाठी तुम्ही कमीत कमी ८ ते ९ तासांची झोप घ्यायला हवी. ८ ते ९ तास शक्य नसल्यास कमीत कमी ७ तासांची झोप तरी घ्या. असं केल्यानं तुम्ही आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल. (Quick Sleep Tricks) लवकर झोप येण्यासाठी मिलिट्री ट्रिक्स पाहूया

दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही? ३ मिलिट्री टिक्स, ढाराढूर झोपाल

दररोज झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ किंवा थंड पाण्याने धुवावा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही ही पद्धत अवलंबलीत तर बेडवर झोपल्यानंतर काही मिनिटांतच तुम्हाला झोप येईल.

दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही? ३ मिलिट्री टिक्स, ढाराढूर झोपाल

बरेच लोक झोपतानाही फोन वापरतात. तुम्ही ही सवय असल्यास ताबडतोब बदला. झोपण्याच्या अर्धा तास आधी फोनपासून दूर राहावे. अशा स्थितीत शांत मनाने काही मिनिटांतच तुम्ही शांतपणे झोपू शकाल.

दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही? ३ मिलिट्री टिक्स, ढाराढूर झोपाल

सरळ झोपावे. जेणेकरून तुमच्या पायाला योग्य विश्रांती मिळेल. पाय पूर्णपणे सैल सोडा. यानंतर झोपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला काही वेळातच झोप येईल.

दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही? ३ मिलिट्री टिक्स, ढाराढूर झोपाल

अनेक वेळा आपण झोपल्याबरोबर इतर गोष्टींचा विचार करू लागतो. तुम्हीही हे करत असाल तर आतापासून तुमची ही सवय बदला. असे केल्याने तुम्हाला झोपेचा त्रास होईल. लगेच झोपायचे असेल तर मन शांत, रिलॅक्स राहू द्या.

दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही? ३ मिलिट्री टिक्स, ढाराढूर झोपाल

रात्री उशीरा जेऊन लगेच झोपायला गेल्यानंतर तुम्हाला गॅस, एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. म्हणून रात्रीची झोप आणि जेवणाच्या वेळेत २ तासांचं अंतर ठेवावं.