चष्मा असो की नसो- मुलांना ५ पदार्थ खायला द्या- डोळ्यांची ताकद वाढेल, नजर होईल तेज
Updated:December 30, 2023 17:17 IST2023-12-30T17:09:36+5:302023-12-30T17:17:08+5:30

हल्ली मुलांचं मोबाईल, टीव्ही पाहण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे कमी वयातच मुलांना चष्मा लागतो आहे.
त्यामुळे डोळ्यांची ताकद वाढविण्यासाठी मुलांना काही पदार्थ आवर्जून खायला दिले पाहिजेत. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया...
यातलं सगळ्यात पहिलं आहे रताळे. रताळ्यांमध्ये असणारे पौष्टिक घटक रेटिनाची ताकद वाढायला मदत करतात.
दुसरं आहे पालक. पालकामध्येही डोळ्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक असणारे अनेक घटक असतात.
पालक आवडत नसेल तर मुलांना दररोज ५ ते १० पिस्ता खायला द्या. पालकामध्ये डोळ्यांच्यादृष्टीने गरजेचे असणारे जे घटक असतात, तेच सगळे घटक पिस्त्यामध्येही असतात.
स्ट्रॉबेरी, संत्री, पेरू, किवी ही व्हिटॅमिन सी च्या बाबतीत भरपूर असणारी फळं देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय पोषक असतात.
ही फळं मिळाली नाहीत तर मुलांना नियमितपणे आवळा खायला द्या. आवळ्याचे मुरंबा, सरब अशा माध्यमातून आवळा खाल्ला तरी चालेल..