Join us   

चालून चालून पाय दुखतात तरी पोट कमी होत नाही? वॉक करताना १ बदल करा; पटापट वजन घटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 3:35 PM

1 / 7
युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेटस विद्यापिठाच्या नवीन अभ्यासानुसार चालण्याच्या पद्धतीत बदल केल्यास मेटाबॉलिझ्म लक्षणीयरित्या वाढतो. ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. हे संशोधन दैनंदिन दिनचर्येत फिटनेस सुधारू पाहणाऱ्यांसाठी गेम चेंच ठरू शकतो.
2 / 7
डेली मेलच्या संशोधनानसार चालताना चयापचन दरावर नॉन युनिफॉर्म स्ट्राइड्सच्या प्रभावावर लक्ष केंद्रीत करा. तुम्ही किती पाऊल चालता आणि किती वेळ चालता याचा तुमच्या चयापचनावर परिणाम होत असतो. असे अभ्यास लेखक अॅडम ग्रिमिट यांनी आऊटलेटला सांगितले.
3 / 7
डॉ. ग्रिमिट यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी चयापचन प्रक्रियेवर स्ट्राईड व्हेरिएशनचा प्रभाव पाहिला. त्यांनी १८ निरोगी प्रौढ लोकांचा अभ्यास केला. ज्यांचे वजन सरासरी १५५ पौंड आहे. सहभागींना प्रथम त्यांच्या नैसर्गिक वॉकींगच्या पद्धतीने ट्रेडमीलवर ५ मिनिटं चालयला सांगण्यात आले.
4 / 7
सहभागींना त्यांच्या नेहमीच्या पायरीपेक्षा ५ टक्के ते १० टक्के कमी किंवा लांब असलेल्या पायऱ्यांवर चालण्याचे निर्देश देण्यात आले.
5 / 7
यावेळी संशोधकांनी कार्बन डाय ऑक्साईडची पातळी मोजली आणि व्यायामाच्या तीव्रतेचे सुचक म्हणून काम करते. या अभ्यासात असं दिसून आले की पाऊलांच्या चालण्याच्या पद्धतीत बदल केल्याने मेटाबॉलिझ्म वाढला होता
6 / 7
नेहमीच्या चालण्यात साधा बदलल करून तुम्ही कॅलरी बर्न वाढवू शकता. तज्ज्ञांना आढळले की स्ट्राईड लांबीमध्ये अगदी फरक देखिल चयापचन वाढीस कारणीभूत ठरतो.
7 / 7
चालण्यासाठी तुम्ही सकाळची वेळ उत्तम आहे पण जर तुम्हाला सकाळी चालायला जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री कधीही १५ ते २० मिनिटं चालू शकता.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सब्यूटी टिप्स