दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

Published:April 7, 2022 02:51 PM2022-04-07T14:51:53+5:302022-04-07T15:11:35+5:30

जबाबदाऱ्यांमागे धावताना बायकांनी अनेक प्राधान्यक्रम ठरवलेले असतात.पण या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ती शारीरिक आणि मानसिक पातळीवर सक्षम असणं गरजेचं असतं. पण यासाठी सर्व जबाबादाऱ्यांमध्ये आपलं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी, स्वत:ची काळजी घेण्याची जबाबदारी बायकांनी प्राधान्यक्रमावर ठेवणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण आरोग्य सांभाळायचं , स्वत:ची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न अनेकींना पडतो. तज्ज्ञ म्हणतात रोजच्या जगण्यात महिलांनी आपलं खाणं पिणं, आपला फिटनेस सांभाळणं . आपला आनंद आणि भावना जपणं म्हणजे स्वत:ची काळजी घेणं. स्वत:ची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडताना काही गोष्टी नियम या स्वरुपातच महिलांनी पाळणं महत्वाचं आहे.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

1. न चुकता नाश्ता: सकाळच्या कामांच्या धावपळीत, सगळ्यांचं खाणं पिणं सांभाळण्याच्या गडबडीत महिला स्वत: नाश्ता करण्याचं टाळतात. पण संपूर्ण दिवस उत्साहानं घालवण्यासाठी, दिवसभर स्वत:ची एनर्जी टिकवण्यासाठी, शरीरातील चयापचय क्रियेची योग्य सुरुवात करण्यासाठी नाश्ता महत्वाचा. सकाळी शांतपणे नाश्ता करण्यासाठी 10-15 मिनिटं बाजूला काढायलाच हवेत.  सकाळचा नाश्ता न चुकता दिवसभरात ठरवलेली कामं उत्साहानं आणि आनंदान पार पडतात.  

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

2. पुरेसं पाणी प्या: नादात शरीराच्या महत्वाच्या गरजांकडे दुर्लक्ष होतं. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. योग्य प्रमाणात पाणी पिण्याच्या गरजेकडे महिलांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे थकवा, चिडचिड हे त्रास होतात. डिहायड्रेशन होतं. हे टाळण्यासाठी न विसरता मधून मधून पिणं गरजेचं आहे. पाणी योग्य प्रमाणात प्याल्यास भूक नियंत्रित राहाते. वजन आटोक्यात राहातं.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

3.वजन नियंत्रित ठेवा: जगण्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे वजन नियंत्रित ठेवणं. योग्य वजनामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा धोका टाळता येतो. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पौष्टिक आहार, झोप आणि व्यायाम या तीन घटकांना महत्व आहे. हे तीन घटकांकडे लक्ष पुरवल्यास वजन नियंत्रित राहातं आणि सुदृढ आरोग्य राहाणं शक्य होतं.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

4. रोज अर्धा तास व्यायाम गरजेचाच: महिलांना होणाऱ्या अनेक आजारांची मुळं ही व्यायाम न करण्यात असतात. निरोगी राहाण्यासाठी प्रत्येकीनं रोज किमान अर्धा तास व्यायाम करायलाच हवा. हदयाचं कार्य सुरळीत चालण्यासाठी, दिवसभर ॲक्टिव्ह राहाण्यासाठी चालणं, जाॅगिंग, सायकलिंग करणं, नृत्य करणं हे व्यायाम महत्वाचे.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

5. पोषक आहाराकडे लक्ष देणं: सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडींकडे लक्ष देताना स्त्रिया आपल्या आहाराकडे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.  स्त्रियांनी  सर्व पोषक घटकांचा समावेश असलेला आहार घ्यायला हवा.  यात ताज्या भाज्या, धान्यं, कडधान्यं, लो फॅट डेअरी उत्पादनं, सुकामेवा यांचा समावेश असायला हवा.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

6. झिंक- मॅग्नेशियम महत्वाचं: कॅल्शियमसोबतच झिंक आणि मॅग्नेशियम ही खनिजं महिलांच्या आरोग्यासाठी महत्वाची असतात. ही खनिजयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला ह्वा. झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. तर् मॅग्नेशियम हे खनिज झोप, हाडांचं आरोग्य जपण्यासाठी, पाळीपूर्वी होणारा त्रास कमी करण्यासाठी, भीती, मायग्रेन या समस्यांचा धोका टाळण्यासाठी महत्वाचं असतं.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

7. शक्य नाही तिथे नाही म्हणा: घरातल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करता यायला हव्यात यासाठी बायका धडपडत असतात. त्या जर पूर्ण करता आल्या नाही,त्यात कुठे कमतरता राहिली तर स्वत:ला दोष देतात. इतरांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात सतत् धावत पळत असतात. या धावपळीत क्षमतेपेक्षा जास्त काम करतात. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी आपल्या क्षमता आणि मर्यादा ओळखणं महत्वाचं. जे शक्य आहे तेवढंच करणं, शक्यतेच्या पलिकडील कामांना, जबाबदाऱ्यांना नाही म्हणायला शिकलं तर महिलांची अनावश्यक धावपळ टळेल . काम करण्याचं समाधान मिळेल. शक्य नसलेल्या गोष्टींना नाही म्हणता येणं हे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

8. नियमित आरोग्य तपासणी: वेळच्या वेळी आरोग्यविषयक तपासण्या करणं हा स्वत:च्या काळजीतला महत्वाचा भाग. नियमित आरोग्य तपासण्यांमुळे शरीरात होणाऱ्या बदलांची जाणीव होते. काही आजार अगदी सुरुवातीलाच लक्षात येतात. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक पातळीवर उपचर करुन आजार बरे करणं सोपं जातं. सुरक्षित आणि निरोगी जगण्यासाठी नियमित आरोग्य तपासण्या महत्वाच्या.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

9. पुरेशी शांत झोप: महिला ज्याप्रमाणे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात तशाच आपल्या झोपेकडेही . दुसऱ्या दिवशी जोमानं काम करण्यासाठी आदल्या दिवशी रात्री पुरेशी आणि शांत झोप लागणं महत्वाचं. पुरेशा झोपेनं केवळ शारीरिक कष्टांची क्षमता आणि उत्पादकताच वाढते असं नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठी 6-7 तासांची शांत झोप आवश्यक असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

दिवसभर एकदम फ्रेश-एनर्जेंटिक-आनंदी राहायचंय, रोज करा 10 गोष्टी!

10. मी टाईम महत्वाचा: कुटुंबाप्रती, कुटुंबातील सदस्यांप्रती जबाबदाऱ्या पार पाडणं, व्यावसायिक भूमिका चोख करणं म्हणजे आयुष्य नव्हे. रोजच्या दिनक्रमात स्वत:साठी, स्वत:च्या आवडीनिवडींसाठी वेळ देता आला तर शारीरिक मानसिक ताण, थकवा दूर होतो. रोज स्वत:साठी किमान दहा मिनिटं काढता येणं ही आरोग्यदायी सवय असते. ही सवय जपल्यास स्वत:प्रती आदर, प्रेम आणि समाधान निर्माण होतं जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं असतं.