Join us   

खराब कोलेस्टेरॉल कमी करायचं आहे? नियमित खा ८ पदार्थ, हार्ट ठेवा ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2023 5:13 PM

1 / 10
कोलेस्टेरॉल हा शब्द आपण ऐकलंच असेल, कोलेस्टेरॉल रक्तात आढळणारा एक प्रकार आहे. जो मेणासारखा असतो, जो चरबीयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्ताच्या नसांमध्ये जमा होतो. यामुळे, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकते ज्यामुळे रक्त प्रवाह मंदावते, या कारणामुळे अनेक रोगांचा धोका शरीरात वाढतो. अनेकांना कोलेस्टेरॉल म्हणजे फक्त चरबी असे वाटते. कोलेस्टेरॉल फक्त चरबी नाही तर ते एक स्टेरॉल आहे. त्याचे खरे नाव लिपो-प्रोटीन असे आहे. कोलेस्टेरॉलमध्ये देखील दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे गुड कोलेस्टेरॉल आणि दुसरा म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल. आपल्याला असे वाटते की, कोलेस्टेरॉलची समस्या फक्त लट्ठ व्यक्तींमध्ये दिसून येते. पण असे नसून बारीक लोकांमध्येही हा प्रकार निदर्शनास येतो.
2 / 10
कोलेस्टेरॉल कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु सर्वप्रथम आपण चरबीयुक्त पदार्थांपासून लांब राहणे गरजेचं. यासह दररोज व्यायाम करावे. यामुळे कोलेस्टेरॉल वितळून बाहेर सहज निघते. कोलेस्टेरॉलवर आयुर्वेदिक उपचारही आहेत. नोएडा येथील 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक डॉ. कपिल त्यागी यांनी काही आयुर्वेदिक उपाय सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काही पदार्थांचे सेवन केल्याने ५ दिवसात कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.
3 / 10
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मध हा उत्तम नैसर्गिक उपाय मानला जातो. डॉक्टरांच्या मते, मध खराब कोलेस्टेरॉलला रक्तवाहिन्यांच्या आत प्रवेश करण्यापासून रोखते. याचा वापर करण्यासाठी एका कप कोमट पाण्यात १ चमचा मध, लिंबाचा रस आणि अॅपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब मिसळून प्या. याचे नियमित सेवन करा याने शरीरामध्ये नक्की फरक दिसेल.
4 / 10
लसूणमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात, जे शरीराला अनेक फायदे देतात. यासह खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. लसणामध्ये अॅलिसिन आणि मॅंगनीज असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यासाठी सकाळी लसणाची एक पाकळी घ्या आणि कोमट पाण्यासोबत खा.
5 / 10
अन्न चविष्ट बनवण्यासाठी वापरण्यात येणारी हळद कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे. हळदचे सेवन केल्याने एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, व शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. यासाठी गरम पाण्यात हळद टाकून प्या.
6 / 10
मेथीच्या बियांमध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व आढळतात, ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. यासाठी एक चमचा मेथी पावडर कोमट पाण्यासोबत प्या. दिवसातून दोन वेळा हे पाणी प्या.
7 / 10
धणे त्याच्या हायपोग्लाइसेमिक प्रभावामुळे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करू शकते. धणे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असून, रक्तातील साखर कमी करण्याचे काम करतात. यासाठी धणे पावडर कोमट पाण्यात मिसळून प्या.
8 / 10
सफरचंद पेक्टिनयुक्त समृद्ध असतात, यासह त्यात फ्लेव्होनॉइड्स नावाचे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आढळतात. जे उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. त्यामुळे फुफ्फुस आणि हृदय निरोगी राहते. यासाठी रोज एक सफरचंद खा.
9 / 10
बीटरूटमध्ये कॅरोटीनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. बीटरूटमुळे रक्तातील साखर आणि रक्तदाब देखील नियंत्रित राहते. त्यामुळे याचे नियमित सेवन करावे.
10 / 10
ऍपल सायडर व्हिनेगर उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. दिवसातून किमान ३ वेळा आपण याचे सेवन करू शकता. यासाठी १ ग्लास पाण्यात १ चमचा ऍपल सायडर व्हिनेगर मिसळा. हे पेय नियमित प्या.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल