Warning Sign Of Bad Cholesterol : घातक कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात ही लक्षणं; सावध व्हा हृदयविकाराचा धोका वेळीच टाळा.. By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 4:29 PM 1 / 7कोलेस्टेरॉलचे नाव ऐकताच आपल्याला असे वाटते की ही आरोग्यासाठी वाईट गोष्ट आहे. कोलेस्टेरॉल चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असते. शरीरात निरोगी पेशी बनवण्यासाठी रक्तात चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, परंतु जेव्हा खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएलचे प्रमाण वाढते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. (Warning sign of bad cholesterol) त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. 2 / 7अनेक वेळा उच्च कोलेस्टेरॉल रक्त गोठण्यास कारणीभूत ठरतात. हे धोके टाळण्यासाठी तुम्हाला सकस आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करावा लागेल. जर शरीरात काही विशेष बदल दिसू लागले तर समजून घ्या की आता सतर्क राहण्याची गरज आहे. (Warning sign of bad cholesterol yellow nail colour numbness of feet high bp blood pressure)3 / 7जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह थांबतो. हात आणि पायांच्या बोटांना योग्य रक्तपुरवठा होत नसल्यामुळे नखांचा रंग हलका गुलाबी ते पिवळा होऊ लागतो. कोलेस्टेरॉल वाढण्याच्या या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.4 / 7जेव्हा तुमचे पाय सुन्न होऊ लागतात तेव्हा ते हलक्यात घेऊ नका, हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. याचा अर्थ रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि रक्तवाहिन्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे, पाय दुखणे आणि ते सुन्न होणे, मुंग्या येणे अशी लक्षणं जाणवतात.5 / 7उच्च रक्तदाबाचा थेट संबंध शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढण्याशी असतो. रक्तातील चरबी जितकी जास्त वाढेल तितका रक्तदाब वाढेल. कारण जेव्हा कोलेस्टेरॉलमुळे रक्तपुरवठ्यात अडथळे येतात तेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यासाठी धमन्यांना अधिक मेहनत करावी लागते.6 / 7तळव्याला आणि पायावर जखमा असेल आणि लवकर बरी होत नसेल, तर ते उच्च कोलेस्टेरॉलमुळे देखील असू शकते. कधीकधी अशा समस्या रक्त परिसंचरण खराब झाल्यामुळे उद्भवतात. ज्या जखमा खूप हळूहळू बऱ्या होतात किंवा अनेक दिवस बऱ्या होत नाहीत. याचा अर्थ असा होतो की कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असल्यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह नीट होत नाही. अशा स्थितीत डॉक्टरांना भेटणे योग्य ठरते. 7 / 7अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, लाल मांसामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केल्याने खराब कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. धान्य, डाळी, बीन्स, भाज्या, कॉर्न आणि फळे यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करून तुम्ही अशा धोक्यांपासून सुरक्षित राहू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications