1 / 7बहुतांश महिलांना टाच दुखण्याचा त्रास होतो. सकाळी झोपेतून उठल्यावर जेव्हा उभं राहातो तेव्हा तर टाचेत खूप वेदना होतात. शिवाय चालतानाही टाच नेहमीच ठणकते.. 2 / 7हा त्रास कधी कधी तर एवढा वाढतो की चालणंही असह्य होऊन जातं. हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच.. पण त्याआधी हे काही उपायही करून पाहा.. कदाचित तुमची टाचदुखी बरी होऊ शकते..3 / 7सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही वापरता ती चप्पल किंवा बूट चांगल्या दर्जाचा, तुमच्या पायाच्या अचूक मापाचा आहे की नाही हे एकदा तपासून पाहा. उंचा टाचेच्या चपला जास्त वेळ वापरल्यानेही टाचदुखी होऊ शकते.4 / 7ज्या व्यक्तींचं वजन जास्त असतं त्यांनाही टाचदुखीचा त्रास होतो. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवा.5 / 7ज्या महिलांना जास्त वेळ उभं राहावं लागतं त्यांनाही टाचदुखीचा त्रास होतो. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा खाली बसून काम करावे.6 / 7ज्या लोकांना मधुमेह असतो त्यांच्यामध्ये पायातील रक्तप्रवाह व नसा खराब झाल्यानेही टाचदुखीचा त्रास होऊ शकतो.7 / 7टाचदुखी कमी करण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवा. नियमितपणे व्यायाम करा. तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवावा असा सल्ला डाॅ. अनिल धुळे देतात.