Join us   

नाजूक अवयवांवरचे केस काढताना नेमकी काय काळजी घ्यावी? त्वचारोग तज्ज्ञ सांगतात ८ गोष्टी, आजार - इन्फेक्शन टाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 3:12 PM

1 / 10
आपल्या शरीरावरील नको असलेले अनावश्यक केस काढण्याकडे महिलांचा कल असतो. जर आपल्याला कुठे सण - समारंभाला जायचे असेल तर आपण पार्लरमध्ये जाऊन आयब्रो, अप्पर लिप्स, चीन हेअर रिमूव्ह करतोच. यासोबतच काही महिला अंडरआर्म्स व 'त्या' नाजूक भागावरील केस नियमित काढतात. नाजूक भागावरील केसांना 'प्यूबिक हेअर' असे म्हणतात. मात्र नाजूक भागावरील केस कसे काढायचे, कोणत्या साधनांचा वापर करावा, प्यूबिक हेअर बाबतीत कोणती काळजी घ्यावी. या संबंधित विषयांचे अनेकदा अज्ञान असते. एवढेच नव्हे तर काही चुकीच्या समजुतीसुद्धा असतात. हे प्यूबिक हेअर काढायच्या अनेक पद्धती आहेत परंतु आपल्याकडे या विषयावर मोकळेपणाने बोललं जात नाही. प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता हा महिलांच्या आरोग्यासंबंधित महत्वाचा विषय आहे. हे 'प्यूबिक हेअर' काढताना काळजी घेणं महत्वाचं आहे.(Dermatologist Suggests Ways to Remove Hair from Intimate Areas).
2 / 10
प्युबिक हेअर ट्रिम करताना काय काळजी घ्यावी याबद्दल 'AAD' अर्थात ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’नं काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
3 / 10
प्यूबिक हेअर काढण्यासाठी जर तुम्ही रेझर वापरत असाल तर त्यासाठीचे रेझर नेहमी वेगळं ठेवा इतर कोणत्याही कामासाठी ते वापरू नका. हे रेझर नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा. शेविंग नंतर त्या जागी मॉइस्चरायजर लावायला विसरू नका.
4 / 10
नाजूक भागावरील हेअर रिमूव्ह करताना उभं राहूनच ट्रिम करा. उभं राहिल्यावर आपण नेमके कशा प्रकारे केस ट्रिम करतोय हे नीट दिसतं. त्यामुळे प्युबिक हेअर ट्रिम करताना बसून करण्यापेक्षा उभं राहूनच केलेले चांगले. यामुळे अपघाताची वा कापण्याची शक्यता कमी होईल.
5 / 10
जेव्हा तुम्ही प्युबिक हेअर ट्रिम करता, तेव्हा ते आपले आपणच करणं आवश्यक आहे. तुमची स्किन, अवयवांचा तुम्हाला जास्त चांगला अंदाज असतो आणि मुळात ती जागा अतिशय संवेदनशील असते म्हणून पार्लर मध्ये ते करणे टाळा.
6 / 10
शेव्हिंग, ट्रिमिंग, वॅक्सिंग या सर्वांसाठी वापरलेली आपली साधनं इतर कुणालाही वापरायला देऊ नका आणि तुम्हीही इतरांची वापरू नका. कारण इतरांनी वापरलेली साधने जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे लैंगिक आजाराची समस्या उद्भवू शकते.
7 / 10
बऱ्याचदा केस काढल्यानंतर पुरळ येण्याची शक्यता असते. पण बेबी ऑईल लावा. ते त्वचेची नाजूकता राखण्यास मदत करते. तर संवेदनशील त्वचेसाठी कोरफड जेल उपयुक्त आहे. त्यामुळे शेव्हिंग झाल्यावर बेबी ऑईल अथवा आफ्टरशेव्ह मॉईस्चराईजरचा उपयोग करा.
8 / 10
प्युबिक हेअर शेव्ह करण्यापूर्वी स्त्रियांनी गरम पाण्याची आंघोळ करावी. विशेषज्ज्ञांनुसार शरीरावर केसांपेक्षा 'प्युबिक हेअर' हे अधिक जाड आणि कडक असतात. त्यामुळे त्यांना नरम करण्यासाठी ५ मिनिट गरम पाण्याने भिजू देणं योग्य आहे. गरम पाणी आपली त्वचा नरम करण्याचे काम करते आणि पोअर्सना आराम मिळतो. यामुळे शेव्हिंग करणे सोपे होते.
9 / 10
शेव्हिंग क्रिम लावल्यानंतर तुम्ही केसांच्या वाढीच्या दिशेने रेझरचा उपयोग करा. तसेच शेव्ह करताना सतत रेझर धुवा. अन्यथा केस अडकण्याची शक्यता असते. शेव्ह करताना अगदी हलक्या हाताने करा.
10 / 10
प्यूबिक हेअर' शेव्ह केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित स्वच्छता राखायला हवी. शेव्ह करताना चुकूनही कापल्यास किंवा इजा झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य