What food is highest in iron : अंगात रक्त कमी झालंय, अशक्तपणा जाणवतो? ५ पदार्थ खा, थकवा दूर होऊन चेहरा दिसेल फ्रेश By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 6:35 PM 1 / 7शरीरासाठी सगळ्यात महत्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे आयर्न. यात प्रोटिन्सचा एक बिल्डींग ब्लॉकच्या स्वरुपात वापर केला जातो. याला हिमोग्लोबिन म्हणतात. (What food is highest in iron) रक्ताच्या माध्यममातून टिश्यूजना ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठी, संक्रमणाशी लढण्यासाठी फायदेशीर ठरते. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास रक्ताची कमतरता भरून काढता येऊ शकते यामुळे शरीर निरोगी आणि तंदरुस्त राहते. (Food for iron deficiency) 2 / 7प्रौढ महिलांना दररोज अंदाजे 15mg लोहाची आवश्यकता असते, तर प्रौढ पुरुष आणि पोस्टमेनोपॉझल महिलांना अंदाजे 8-9mg लोह आवश्यक असते.3 / 7पाले भाज्यांमध्ये भरपूर आयर्न असते. पालक, केल, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राऊट्स हे पदार्थ आयर्नचे प्रमुख स्त्रोत आहेत. पालेभाज्या तुम्ही स्मूदी, सूप किंवा डाळींसह भाजीच्या स्वरूपात खाऊ शकता. 4 / 7बदाम, काजू, मनुका, जर्दाळू हे लोहाचे चांगले स्रोत आहेत. 100 ग्रॅम जर्दाळूपासून तुम्हाला सुमारे 6.5 मिलीग्राम लोह मिळते. हे सर्व ड्राय फ्रूट पचनालाही मदत करतात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.5 / 7डाळींमध्ये लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. शिजवलेल्या डाळी सुमारे ७ मिलीग्राम लोह मिळते. मूग डाळ ही पचायला हलकी असते. रात्रीच्या जेवणात तुम्ही या डाळीचा समावेश करू शकता. याशिवाय तूर डाळ, मसूर डाळ तब्येतीसाठी उत्तम आहेत.6 / 7ब्लड काऊंट वाढवण्यासाठी डाळिंब हे एक उत्तम फळ आहे. ते जसे आहे तसे घेणे किंवा रस स्वरूपात घेणे उत्तम ठरतं.7 / 7व्हिटॅमिन-सी समृद्ध असलेल्या इतर पदार्थांसोबत लोहयुक्त अन्न एकत्र केल्यास शरीरात लोहाचे शोषण वाढण्यास मदत होते. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या लोहाचे सेवन वाढवत असाल तेव्हा लिंबूवर्गीय फळे, बेरी, ब्रोकोली, कोबी, मिरी आणि टोमॅटो यासारख्या पदार्थांचे सेवन वाढवा. आणखी वाचा Subscribe to Notifications