मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

Updated:February 18, 2025 17:44 IST2025-02-18T17:34:55+5:302025-02-18T17:44:26+5:30

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

पाळी सुरू होण्यापुर्वी शरीरात काही बदल होत असतात. पण कोवळ्या वयाच्या मुलींना ते लक्षातही येत नाहीत. तसंच काहीसं पाळी जाताना म्हणजेच मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असणाऱ्या महिलांच्या बाबतीतही होतं.(what is the first symptom of menopause?)

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

या महिलांना त्यांचं शरीर मेनोपॉजविषयी सूचना देऊन सतर्क करत असतं. पण शरीरात काही वेगळं होत आहे हे जाणवत असूनही बऱ्याच जणींचं मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं (common symptoms of menopause). मेनोपॉजची लक्षणं कोणती याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी amitagadre या पेजवर शेअर केली आहेत.(how to identify menopause symptoms?)

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

यामध्ये त्या सांगतात हॉट फ्लश म्हणजे खूप जास्त गरमी होणे, सतत घाम येणे हे मेनोपॉजचं पहिलं लक्षण आहे असं बहुसंख्य महिलांना वाटतं. पण तसं नाही.

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

वयाच्या पस्तिशीतच काही जणींना ब्रेन फॉगचा त्रास सुरू होतो आणि ते मेनोपॉजचं पहिलं लक्षण आहे. ब्रेन फॉग म्हणजे छोट्याछोट्या गोष्टी विसरून जाणे, कामात मन एकाग्र न होणे, कोणताही ठाम निर्णय न घेता येणे आणि स्मरणशक्ती थोडी कमी होणे. जवळपास ९० टक्के महिलांना हा त्रास झाल्याचं त्यांच्या अभ्यासावरून लक्षात आलं आहे.

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

याशिवाय बऱ्याच महिलांचं मेनोपॉज जवळ येताच अचानक वजन वाढतं. ओटीपाेटाचा भाग जास्त सुटल्यासारखा वाटतो.

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

शरीरातली काेलेस्ट्रॉलची पातळी एकदम वाढलेली दिसून येते.

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

एन्झायटी वाढते. सतत अस्वस्थ होतं किंवा कोणत्याही गोष्टीचा मनावर खूप ताण येतो. ओझं वाटतं.

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण

काही जणींची झोप सुद्धा कमी होते. रात्री अंथरुणावर पडून राहिलं तरी झोप लागत नाही. झोप लागली तरी लगेच जाग येते. शांत झोप होत नाही.