What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय

Published:August 22, 2022 01:28 PM2022-08-22T13:28:55+5:302022-08-22T13:42:28+5:30

What is Tomato Flu : या आजाराचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. या आजाराचा सोर्स व्हायरस असून टोमॅटो फिव्हर कोणत्या कारणांमुळे पसरतो हे अद्याप समोर आलेलं नाही.

What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय

जगभरातील लोक गेल्या दोन वर्षांपासून कोरोना माहामारीचा सामना करत होते. गेल्या काही महिन्यात मंकीपॉक्स या नव्या आजारानं चिंता वाढवली तर आता हॅण्ड फुट अॅण्ड माऊथ डिसीजचा लागण होत आहे. या आजाराला टोमॅटो फिव्हर असंही म्हणतात. (Tomato Flu All about the rare viral disease affecting children in India; Know symptoms and treatment)

What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय

लेसेंट रेस्पिरेटरी जर्नलच्या अभ्यासानुसार ६ मे २०२२ ला केरळमध्ये पहिल्यांदा टोमॅटो फ्लूचं प्रकरण समोर आलं होतं. हा त्रास पाच वर्ष वयोगटातील मुलं आणि कमकुवत इम्यूनिटी असलेल्या वयस्कर लोकांमध्ये उद्भवतो.

What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय

इंडिया टु डेच्या रिपोर्टनुसाार लेसेंटच्या अभ्यासात नमूद करण्यात आले होते की टोमॅटो फ्लूची लक्षणं कोव्हिड १९ व्हायरसच्या लक्षणांप्रमाणेच समान असतात. टोमॅटो फ्लू लहान मुलांमध्ये चिकनगुनिया किंवा डेंग्यूच्या तापानंतर होऊ शकतो. या फ्लूचं नाव टोमॅटो फ्लू आहे कारण यामुळे संपूर्ण शरीरावर लाल, वेदनादायक पुळ्या होतात.

What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय

लेसेंटच्या रिपोर्टनुसार लहान मुलं टोमॅटो फ्लूच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त असतो. वयानुसार हे व्हायरल संक्रमण लहान मुलांमध्ये वेगानं पसरतं. ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हा आजार वाढत आहे.

What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय

टोमॅटो फ्लूचे मुलांमध्ये दिसणारं प्राथमिक लक्षण चिकनगुनिया किंवा डेंग्युच्या तपाप्रमाणे असतात. ताप, अंगावर लाल चट्टे येणं, उलट्या, डियाड्रेशन, सांधेदुखी, त्वचेवर पुळ्या येणं.

What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय

या आजाराचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. या आजाराचा सोर्स व्हायरस असून टोमॅटो फिव्हर कोणत्या कारणांमुळे पसरतो हे अद्याप समोर आलेलं नाही.

What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय

या आजारापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हा आजार सर्वाधिक जाणवत असून लक्षणं दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा. जास्तीत जास्त पाणी प्या.