तेलकट पदार्थ किंवा जंकफूड खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ७ पदार्थ, अपचन-ॲसिडिटी होणार नाही... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2024 3:11 PM 1 / 9आजकाल आपण सतत वेगवेगळ्या प्रकारचे जंकफूड खात असतो. कितीही टाळलं तरी जंकफूड खाण्याचा, तेलकट- मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह होतोच. असे पदार्थ खाल्ले की मग बऱ्याच जणांना ॲसिडीटी- अपचनाचा त्रास होतो. असा त्रास होऊ नये म्हणून जंकफूड किंवा इतर तेलकट- तुपकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खावेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी Fiteloapp या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पदार्थांनंतर खावेत, ते पाहा...2 / 9१. मसालेदार, चमचमीत बिर्याणी खाल्ल्यावर एक ग्लास ताक प्यावे. 3 / 9२. इंस्टंट नूडल्स खाल्ल्यानंतर एक सफरचंद किंवा काकडी या दोघांपैकी काहीतरी एक आवर्जून खा. 4 / 9३. अगदी तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर त्यानंतर केळं खा. यामुळे तिखट, मसाल्याचे पदार्थ पचण्यास अधिक मदत होते. आपण पेर किंवा संत्री- मोसंबी देखील खाऊ शकता. 5 / 9४. तळलेले तेलकट - तुपकट पदार्थ खाल्ल्यावर हर्बल टी नक्की प्यावी. 6 / 9५. वेफर्स सारखे तेलकट आणि खारट स्नॅक्स खाल्ल्यावर कलिंगड खावे. 7 / 9६. बार्बेक्यू फूड खाल्लं असेल तर त्यानंतर एक केळ आवर्जून खा.8 / 9 ७. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर सेलेरी ज्यूस प्यावा.9 / 9८. हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्ही खाल्लेल्या जंकफूडमधील किंवा तेलकट- तुपकट पदार्थांमधील अतिरिक्त शुगर शरीराबाहेर पडण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications