जिभेवर पांढरा थर जमा झालाय? ७ घरगुती उपाय, जीभ खराब असणे ही आजाराची लक्षणंही असू शकतात.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2022 6:06 PM 1 / 8अनेकदा जिभेवर पांढरा थर साचतो. बोलताना हा पांढरा थर दिसून येतो, ज्यामुळे आपले व्यक्तिमत्व दुसऱ्यांसमोर खराब दिसते. पांढरा थर आरोग्यासाठी चांगले नाही. पांढऱ्या थरामुळे मुखदुर्गंधी, दात किडणे, पचनक्रिया खराब होणे, तसेच फंगल इंफेक्शन देखील होते. आपण बऱ्याचवेळा दातांची काळजी घेत असतो. मात्र, संपूर्ण तोंडाची आणि जिभेची योग्य काळजी घेत नाही. अनेक लोकं महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करून तोंडाची सफाई करतात. मात्र, तसं न करता आपण घरगुती पद्धतीने जीभ साफ करू शकता. त्यामुळे या घरगुती उपायांचा वापर करा. जेणेकरून घरच्या साहित्यात आपली जीभ साफ होईल. 2 / 8जिभेला साफ करण्यासाठी आपण नैसर्गिक स्क्रब म्हणून मिठाचा वापर करू शकता. जिभेवर मीठ टाका त्यानंतर एका टूथब्रशने जीभ स्वच्छ साफ करून घ्या. आणि शेवटी गरम पाण्याने गुळण्या करून तोंड साफ करून घ्या. उत्तम रिझल्टसाठी ही प्रक्रिया आठवड्यातून ४ वेळा तरी करा.3 / 8नारळाचे तेल आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आपण आपली जीभ साफ करण्यासाठी नारळाच्या तेलाचे वापर करू शकता. नारळाच्या तेलात अँटीसेप्टिक गुण असतात. नारळाच्या तेलाने दररोज गुळण्या करा. असे केल्याने तोंडातील जंतू नष्ट होईल.4 / 8जिभेवर साचलेला पांढरा थर, फंगस आणि दुर्गंधी घालवण्यासाठी दही खूप उपयुक्त आहे. दह्यामध्ये प्रो-बायोटिक गुण असते, जे जिभेवरील थर काढण्यास मदत करतील. जिभेवर दही ठेवा आणि स्क्रब करा. त्यानंतर तो थर ब्रशने काढा. आणि शेवटी पाण्याच्या गुळण्या करा. असे केल्याने जीभ साफ होईल.5 / 8बेकिंग सोडा अनेक गोष्टींसाठी मदतगार आहे. बेकिंग सोडामध्ये लिंबूचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जिभेवर लावा आणि ब्रशने स्क्रब करा. शेवटी पाण्याच्या गुळण्या करा. असे केल्याने जिभेवरील पांढरा थर कमी होईल. 6 / 8बहुगुणी हळद पावडर अनेक कारणांसाठी उपयुक्त आहे. आपण याने जिभेची सफाई करू शकता. जिभेवर हळद पावडर टाका आणि ब्रशने स्क्रब करा. असे केल्याने जिभेवरील पांढरा थर कमी होईल. यासह दुर्गंधीपासून सुटका मिळेल.7 / 8कोरफड जेल अनेक कारणांसाठी वापरली जाते. त्यातील गुणकारी तत्वे केस, त्वचा, यासह शरीरातील घाण काढण्यास मदतगार आहे. कोरफड जेल जीभ साफ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जिभेवर जेल लावून आपण स्क्रब करू शकता. याने जीभ साफ होईल आणि दुर्गंधी देखील दूर होईल. 8 / 8जिभेच्या स्वच्छेतेसाठी लसूण हा उत्तम घरगुती उपाय आहे. दररोज २ ते ३ कच्चे लसूण खा. याने जिभेवरील पांढरा थर जाईल. लसणेमध्ये असलेल्या अँटी-मायक्रोबियल गुणांमुळे तोंडातील दुर्गंधी कमी होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications