भाताशिवाय जेवणच जात नाही? रोज जास्त भात खाल्ल्यानं उद्भवतात हे ६ त्रास, प्रमाण चुकवू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:44 IST
1 / 7भारतातील बरेच लोक डाळीसोबत भात खाणं पसंत करतात. काही लोक भाताशिवाय जेवतचनाही. दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानं तब्येतीवर चांगला परिणाम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का हेल्थ एक्सपर्ट्स रात्री भात न खाण्याचा सल्ला देतात. याचा तुमच्या तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. 2 / 7रात्री भात खाल्ल्यानं गट्स हेल्थवर चुकीचा परिणाम होतो. रात्री भात खाल्ल्यानं पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. गॅस, एसिडीटीसारख्या समस्या उद्भवल्यास रात्रीच्यावेळी भात खाणं टाळायला हवं. 3 / 7रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्यानं तुमचं वजन वाढू शकतं आणि कायमचा लठ्ठपणा येऊ शकतो.4 / 7 लठ्ठपणा अनेक गंभीर आजारांना निमंत्रण दोतो. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भात खाणं टाळा.5 / 7ज्या लोकांना दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो. त्यांनी रात्रीच्या जेवणात तांदूळ खाणं टाळायला हवं. 6 / 7हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते रात्री भात खाल्ल्यानं घशात त्रास होतो. ज्यामुळे सायनसची समस्या उद्भवू शकते. 7 / 7डायबिटीक पेशंट्सनी भात जास्त खाल्ल्यास त्यांची ब्लड शुगर वाढू शकते. म्हणून रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळायला हवं.