आधी नाश्ता मग आंघोळ करता? आंघोळीआधी नाश्ता केल्यानं होऊ शकतात पोटाचे त्रास, समजून घ्या
Updated:August 30, 2024 11:49 IST2024-08-29T20:28:35+5:302024-08-30T11:49:34+5:30
Why Should We Eat Food After Taking A Bath : पचनक्रियेवर परिणाम झाल्यानं व्यक्तीला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात बरेच लोक सकाळी उठल्यानंतर ब्रश करून आधी नाश्ता करतात त्यानंतर नाश्ता करतात. अंघोळीनंतर खायला हवं असं म्हटलं जातं पण बरेच लोक हे रूटीन फॉलो करत नाही. आधी नाश्ता करून नंतर अंघोळीला जातात.
तुम्ही अनेकांना हे सांगताना ऐकलं असेल की आंघोळ झाल्याशिवाय काहीही खाऊ नये किंवा काहीही खाल्ल्यानंतर लगेच अंघोळ करू नये. खाल्ल्यानंतर अंघोळ केल्यानं शरीरावर काय परिणाम होतो ते समजून घेऊया.
खाल्ल्यानंतर अंघोळ करण्याची सवय असेल तर ही सवय वेळीच बदलायला हवी. असं केल्यानं अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकता. खाल्ल्यानंतर शरीराची प्राकृतिक पचनक्रिया सक्रिय होते. पचनक्रियेला अधिक प्रमाणात उर्जेची आवश्यकता असते.
ज्यामुळे पोटातील रक्त प्रवाह वेगानं वाढू लागतो. जेवल्यानंतर शरीराचे तापमान हळूहळू वाढते. कारण रक्त शरीरातील पचनावर परिणाम करते. जेवल्यानंतर लगेच अंघोळ केल्यानं रक्तात बदल होता. यामुळे पचनक्रियेवरही चुकीचा परिणाम होतो.
पचनक्रियेवर परिणाम झाल्यानं व्यक्तीला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकता. याव्यतिरिक्त अस्वस्थता, पोटात कळा येणं, जेवल्यानंतर सुस्ती येणं असे त्रास उद्भवू शकतात चिडचिड होते. म्हणून जेवल्यानंतर अंघोळ करणं चुकीचं ठरतं.
धार्मिक मान्यतांनुसार खाल्यानंतर पोटातील अग्नी तत्व सक्रिय होता. अशात अंघोळीनंतर पोटाच्या तापमानात घट होते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. म्हणूनच जेवणाच्या कमीत कमी १ तासानंतरच अंघोळ करायला हवी.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जे लोक सकाळी उठून अंघोळ करत नाही तसंच दिवसाची सुरूवात करतात त्यांचा संपूर्ण दिवस आळसात आणि ताण-तणावात जातो. अंघोळीनंतर खाल्ल्यानं शरीराला उर्जा मिळते आणि शरीर व्यवस्थित काम करते.