Why We Should Not Drink Water Eating Corn
मका खाल्ल्यानंतरपाणी का पिऊ नये? पावसाळ्यात पोटाचे त्रास नको, म्हणून तज्ज्ञ सांगतात...Published:June 13, 2024 08:46 AM2024-06-13T08:46:00+5:302024-06-13T18:43:12+5:30Join usJoin usNext Why We Should Not Drink Water Eating Corn पावसाळ्याच्या दिवसांत बाजारात मके दिसायला सुरूवात होते. लिंबू, मीठ लावून तुम्ही मक्याचा समावेश करू शकता. पावसाळ्यात मका खाल्ल्याने तोंडाची चव वाढते याशिवाय त्यातून व्हिटामीन सी, व्हिटामी बी-१२, कॅल्शियम, फायबर्स यांसारखी पोषक तत्व मिळतात. (Why We Should Not Drink Water Eating Corn) मका खाल्ल्यानंतर नेहमी तहान लागते पण पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. अनेकजण असं म्हणतात की मका खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने ताप येतो. पण खरंच मका खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने काही होतं का, पाणी का पिऊ नये याची उत्तरं समजून घेऊ. एक्सपर्ट्सच्या मते मका खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. कारण यामुळे पोटाच्या आरोग्यात बिघाड होऊ शकतो. पचनक्रिया संथ होते. असं यामुळे होतं कारण यात कॉम्पलेक्स कार्ब्स आणि स्चार्च असते. हे खाल्ल्यांतर काही वेळानंतर पोटात वेदना होऊ लागतात. पोटात गॅस तयार होतो. ब्लॉटींग, गॅसची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत मका खाणं आणि पाणी पिणं टाळायला हवं. मका खाल्ल्यानंतर ४५ मिनिटांनी पाणी प्यायला हवं. मका खाताना वेगवेगळ्या गोष्टींची सावधगिरी बाळगायला हवी. मका पावसाळ्यात मिळतो आणि या वातावरणात शरीर आजारांप्रती संवेदनशील असते. ताजा आणि गरम मका खा. जास्तवेळ स्टोअर केल्यानं त्यात हानीकारक बॅक्टेरियाज तयार होऊ शकतात.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth