हिवाळ्यात ५ गोष्टींकडे नियमित लक्ष द्या; सर्दी-थंडीतापाला लांब ठेवा, तब्येत सुधारा.. Published:November 22, 2022 03:31 PM 2022-11-22T15:31:27+5:30 2022-11-22T16:21:01+5:30
Winter Care Tips for Good Health : आपल्या आहार-विहारात कोणते बदल केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो ते पाहूयात. आपल्या आहार-विहारात कोणते बदल केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो ते पाहूयात. थंडीच्या दिवसांत अनेकांना सर्दी-खोकला, ताप, घसादुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र हवाबदल झाला तरी आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी काय करावं याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. अशावेळी आपल्या आहार-विहारात कोणते बदल केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो ते पाहूयात (Winter Care Tips for Good Health).
१. गरम पाणी
थंड हवेमुळे अनेकदा आपल्याला कफ किंवा घसा दुखणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी गरम पाणी प्यायल्यास हा कफ निघून जाण्यास मदत होते. तसेच थंडीच्या दिवसांत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तरी गरम पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते
२. वाफ घेणे
थंडीच्या दिवसांत आठवड्यातून किमान २ वेळा वाफ घ्यायला हवी. वाफ घेतल्याने आपली केवळ सर्दी आणि कफापासून सुटका होते असे नाही. तर त्वचा चांगली राहण्यासही याची चांगली मदत होते.
३. तेलाने मसाज
थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचेला खाज येणे, त्वचेचा कोंडा पडणे अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी त्वचेला खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. यामध्ये आपण हातापायांबरोबरच चेहऱ्यालाही तेलाने मसाज करायला हवा.
४. बीट-गाजर
थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. थंडीमुळे होणारी शरीराची झीज भरुन काढण्यासाठी या काळात आहारात बीट-गाजर यांबरोबरच पालेभाज्या यांचा भरपूर समावेश करायला हवा. बीट आणि गाजराचा ज्यूस करुन प्यायल्यासही त्याचा चांगला फायदा होतो.
५. गुळ
गुळ हा उष्ण पदार्थ मानला जातो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी गुळाचा चांगला उपयोग होतो. साखरेला गुळ हा उत्तम पर्याय असल्याने साखरेऐवजी गुळ वापरण्याचा सल्ला अनेक जण देतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत गुळाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.