Join us   

इतरांपेक्षा तुम्हाला जास्त थंडी वाजते? शरीरात ४ गोष्टींची कमतरता असू शकते, लक्ष द्या-तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 11:53 AM

1 / 8
काहीजणांना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते. थंडी वाजणं हे शरीराच्या तापमानाशी निगडीत असतं. बाहेरच्या तापमानानं आपलं रक्त आणि बॉडी फ्लूइड जोडलं जातं. म्हणजेच शरीरात जे द्रव पदार्थ आहेत ते तापमान वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं काम करतात. (Why some people feel the cold more than others)
2 / 8
आपल्याला त्वचेवर प्रथम थंडी जाणवते. कधी कधी बोटे सुन्नही होतात. तापमानात वाढ आणि घसरण प्रथमच आपल्या त्वचेवर जाणवते. आपल्या त्वचेच्या अगदी खाली असलेल्या थर्मो-रिसेप्टर मज्जातंतू लहरींच्या रूपात मेंदूला थंडीचा संदेश पाठवतात.
3 / 8
त्याची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलू शकते. त्वचेतून बाहेर पडणाऱ्या लहरी मेंदूच्या हायपोथालेमसमध्ये जातात. हायपोथालेमस शरीराचे अंतर्गत तापमान आणि वातावरण संतुलित करण्यास मदत करते. हे संतुलन साधण्याच्या प्रक्रियेमुळे आपले केस टोकावर उभे राहतात आणि स्नायूही आकुंचन पावू लागतात.
4 / 8
लोहाची कमतरता असलेल्या लोकांना इतर लोकांपेक्षा जास्त थंडी जाणवू शकते. वास्तविक, जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा शरीरातील रक्ताची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे अॅनिमिया होतो. रक्त कमी झाल्यामुळे जास्त थंडी वाजू शकते. याशिवाय गरोदरपणात किंवा मासिक पाळीच्या काळातही लोकांना जास्त थंडी जाणवू शकते.
5 / 8
पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे अॅनिमिया देखील होऊ शकतो. व्हिटॅमिन बी-12 आणि फॉलिक अॅसिडची कमतरता असलेल्या लोकांनाही थंडी वाजण्याची शक्यता असते.
6 / 8
जेव्हा शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होते, तेव्हा शरीर थंड होऊ लागते. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताभिसरण कमी आहे त्यांना जास्त थंडी जाणवू शकते. अशा अवस्थेत, धमन्या अरुंद होतात, ज्यामुळे तुमच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो आणि तुम्हाला इतर लोकांपेक्षा जास्त थंडी जाणवू शकते.
7 / 8
पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला जास्त थंडी जाणवू शकते. वास्तविक, शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो, अशक्तपणा होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त थंडी जाणवू शकते.
8 / 8
जर तुमचे वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणात कमी असेल, योग्य झोप न लागणे हे देखील थंडी वाजण्याचे कारण असू शकते. तुम्हाला डिहायड्रेशन झालं असेल तरीही तुम्हाला जास्त थंडी जाणवू शकते. शरीरात व्हिटॅमिन बी ची कमतरता असली तरी थंडी जास्त जाणवते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी