ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2024 1:46 PM 1 / 7स्तनपान करणाऱ्या आईला खूप लवकर थकवा येतो. पाठ- कंबर गळून जाते. थोड्याफार फरकाने हा त्रास प्रत्येक स्तनदा मातेला होतोच.2 / 7कारण दुधातून तिच्या शरीरातले पोषक घटक तिच्या बाळाला मिळतात. त्यामुळे मग आईच्या शरीरात अनेक घटकांची कमतरता निर्माण होते. म्हणूनच तिचा आहार समतोल आणि सर्व पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असावा. यासाठी आईने काय खावे, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली खास माहिती..3 / 7आई जे काही पदार्थ खाणार आहे ते सगळे पदार्थ तेलाऐवजी तुपात केलेले असावेत.4 / 7आईने नेहमी ताजा आहार घ्यावा. म्हणजेच स्वयंपाक केला की तो ३ तासांच्या आत स्तनदा मातेने खावा.5 / 7स्तनदा मातेच्या आहारात दररोज हिरव्या पालेभाज्या असायलाच पाहिजेत. त्यामुळे आईला कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही. 6 / 7नाचणीचे वेगवेगळे पदार्थही नव्या आईच्या आहारात असायला पाहिजेत.7 / 7दोन जेवणांच्या मध्ये भूक लागल्यास आईला प्रोटीनयुक्त पदार्थ खायला द्यावेत. यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालून केलेलं मुगाच्या डाळीचं सूप देऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications