ॲनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी 'हा' आहार घ्या, आयर्न वाढून थकवा कमी करण्यासाठी फार आवश्यक
Updated:March 5, 2025 20:02 IST2025-03-05T15:42:52+5:302025-03-05T20:02:19+5:30

हिमोग्लोबिन म्हणजेच शरीरातलं लोह कमी असेल तर खूप अशक्तपणा येतो. नेहमीच गळून गेल्यासारखं, थकल्यासारखं होतं. यालाच आपण ॲनिमिया असंही म्हणताे.
ॲनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी तसेच शरीरातलं हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी लोहयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत हे आपल्याला माहिती आहे.
पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी साेशल मीडियावर याबाबतची माहिती नुकतीच शेअर केली असून त्यामध्ये त्यांनी ॲनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी लोहयुक्त पदार्थांसोबत आणखीही काही पदार्थ खायला पाहिजेत असं सुचवलं आहे.
त्यानुसार फोलेट, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ए देणारे पदार्थही तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात असायला हवे.
त्यासोबतच व्हिटॅमिन सी देणारे भरपूर फळं ॲनिमियाच्या रुग्णांनी खायला हवेत. कारण शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी असेल तरच अन्नपदार्थांमधून मिळणारं लोह रक्तामध्ये शोषून घ्यायला मदत होते.
पिवळ्या आणि लाल रंगाच्या भाज्या पुरेशा प्रमाणात खाल्ल्यानेही ॲनिमियाचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. कारण त्यांच्यामध्येही व्हिटॅमिन सी आणि लोह असतं.
त्याचबरोबर फोर्टिफाईड फूड खाण्यावरही भर द्यायला हवा असं WHO ने सुचवलं आहे. कारण सामान्यपणे आपल्या आहारातून आपल्याला जे व्हिटॅमिन्स, खनिजे मिळत नाहीत ते सगळे काही अन्नपदार्थांमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यालाच फोर्टिफाईड फूड म्हणतात.