World Menopause Day 2024 : मेनोपॉज जवळ आला म्हणून भीती वाटते? पाहा, त्यावर उपाय काय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 6:17 PM 1 / 7World Menopause Day 2024 : मेनोपॉज हा काळ अवघड असतो पण म्हणून हरुन कसं चालेल? ( World Menopause Day 2024 Menopause and Menopause Hormone Therapy theme)पाळी येणं हे प्रत्येकीच्या आयुष्यात जेवढं महत्त्वाचं असतं, तेवढंच महत्त्वाचं आहे पाळी जाणं. पाळी जाण्याच्या या प्रक्रियेलाच आपण मेनोपॉज म्हणतो. या काळात प्रत्येकीला जाणवणारा त्रास वेगवेगळा असतो. मेनोपॉज ही एक नैसर्गिक घटना आहे. पण त्याचा शारिरीक, मानसिक स्तरावर जास्त त्रास होऊ नये म्हणून काय करावं, याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मिडियावर शेअर केला हाेता.2 / 7ऋजुता म्हणतात की मेनोपॉज एकदम येत नाही. तो येण्याआधी एक- दिड वर्ष तुमच्या शरीरात काही बदल सुरू झालेले असतात. स्वत:च्या मासिक पाळीमध्ये काही बदल होत आहेत हे लक्षात आलं की मग मेनोपॉजची जाणीव होते आणि त्यानंतर मग अनेकजणी तो त्रास सुसह्य होण्यासाठी प्रयत्न करतात. पण असं करण्यापेक्षा कमी वयापासूनच काही सवयी स्वत:ला लावून घ्या. त्यामुळे पाळी जाताना तुम्हाला त्रास होणार नाही. त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा..3 / 7मेनोपॉजदरम्यान इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी कमी होत जाते. ही पातळी हळू- हळू कमी झाली तर मेनोपॉजचा त्रास जाणवत नाही. यासाठी योग्य आहार घेण्याची आणि शरीरात होणारे सगळे बदल शांततेत स्विकारण्याची गरज आहे. त्या काळात वजन वाढलं तरीही मेनोपॉजचा पॅच निघून गेल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुमचं वाढलेलं वजन नियंत्रणात आणू शकता. त्याचा खूप ताण घेण्याची गरज नाही.4 / 7आपल्या भागातली खाद्यसंस्कृती ही आपली मोठी ताकद आहे. ज्या सणाला ज्या पदार्थाचं महत्व आहे किंवा ज्या हंगामात जे फळं, पदार्थ मिळतात, ते भरपूर खा. आपल्या संस्कृतीनुसार जर खाद्य पदार्थांमधली ही विविधता जपली तर शरीराला मोठ्या प्रमाणात मायक्रो न्यूट्रीएंट्स मिळतात. व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, आयर्न, फॉलिक ॲसिड असे घटक जर शरीराला योग्य प्रमाणात मिळाले तर निश्चितच मेनोपॉजचा त्रास कमी होतो5 / 7वेटलॉस करताना वजन कमी करण्याच्या मागे लागण्यापेक्षा चांगलं आणि सकस खाण्याचा प्रयत्न करा. झपाट्याने वजन कमी करण्याच्या नादात लागू नका. हळू- हळू वजनावर नियंत्रण मिळवा. वेटलॉस हा हळूवार आणि टिकून राहणारा असावा.6 / 7दर आठवड्यात तीन तास वर्कआऊट करणं गरजेचं आहे. यामध्ये दोन दिवस तुम्ही स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि बोन डेन्सिटी, मसल टोन करणारा व्यायाम केला पाहिजे. दोन दिवस योगासने केली पाहिजेत आणि उरलेले दोन दिवस सायकलिंग, वॉकिंग किंवा इतर कोणताही व्यायाम प्रकार केला पाहिजे.7 / 7शरीरातले हार्मोन्स संतूलित ठेवण्यासाठी वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं खूप जास्त गरजेचं आहे. रात्री ९: ३० ते ११ यावेळेत आपण झोपलंच पाहिजे आणि सकाळी ६- ७ च्या दरम्यान उठलं पाहिजे. दुपारी २० मिनिटांची छोटीशी नॅप नक्की घ्या. कारण यामुळे शरीरातले हार्मोन्स नियंत्रित ठेवायला खूप जास्त मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications