World Mental Health Day: डिप्रेशनशी सामना करणारे ८ सेलिब्रिटी, आजार न लपवता हिमतीने केला मानसिक आजाराचा सामनाPublished:October 10, 2022 06:04 PM2022-10-10T18:04:43+5:302022-10-10T18:16:38+5:30Join usJoin usNext १. आपल्याप्रमाणेच सेलिब्रिटींनाही डिप्रेशन येतं.. त्यांनाही या गोष्टींचा भयंकर त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला जर असा मानसिक त्रास होत असेल, डिप्रेशन आल्यासारखं वाटत असेल तर या काही सेलिब्रिटींना नक्की बघा. त्यांनी तो आजार लपवला तर नाहीच, पण या आजारावर त्यांनी कशी मात केली, हे मोठ्या हिंमतीने जगासमोर सांगितलं. २. १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आजार दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त हे काही सेलिब्रिटी बघा, ज्यांनी खरोखरंच डिप्रेशनवर मात कशी करायची हे आपल्याला शिकवलं आहे. डिप्रेशनचा विषय निघाल्यावर सगळ्यात पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे दीपिका पदुकोन. योग्य औषधोपचार, योगा, मेडिटेशन असे सर्वच उपाय करून दीपिकाने तिचा हा त्रास कमी केला आहे. ३. अनुष्का शर्मालाही काही वर्षांपुर्वी डिप्रेशनचा त्रास होत होता. त्यावेळी तिनेही तिला होणारा मानसिक त्रास सोशल मिडियाच्या माध्यमातून जगासमोर आणला. यावेळी ती हेच म्हणत होती की बहुतांश लोक त्यांचा मानसिक त्रास स्विकारायला, दुसऱ्यांना सांगायला लाजतात. मला त्यांच्या मनातली हीच भीती घालवायची आहे. यात लाजिरवाणं होण्यासारखं काहीच नाही, हे ती सातत्याने सांगते. ४. किंग खान म्हणजेच शाहरुख खानलाही डिप्रेशनने ग्रासले होते. २०१० साली शाहरुखच्या खांद्याला लिगामेंट इंज्युरीचा त्रास झाला होता. यावेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या, हे दुखणं बरेच दिवस चाललं. या काळात त्याने मानसिक आजाराचाही सामना केला होता. ५. अभिनेता वरुण धवन याबाबत म्हणतो की डिप्रेशन किंवा नैराश्य येणं हा खरोखरच हलक्यात घेण्यासारखा आजार नाही. ही अवस्था खूप कठीण असते. वरुण पुर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेला नव्हता. पण तरीही मनात नकारात्मक विचार येणं, मानसिक स्वास्थ्य चांगलं नसल्याचं वारंवार जाणवत राहणं अशा प्रकारचा त्रास त्यानेही सहन केला होताच. ६. करण जोहरनेही काही काळापुर्वी जवळपास एक ते दिड वर्षे डिप्रेशनचा त्रास भोगला. या काळात हार्ट फेल होईल की काय, अशी भीती त्याला कायम वाटायची. वारंवार एन्झायटीच्या गोळ्या घ्याव्या लागायच्या. थेरपी आणि कौन्सेलिंग यामुळे तो या आजारातून बाहेर पडला. ७. करिअर, रिलेशनशिप यांच्यामध्ये आलेले अपयश काही वर्षांपुर्वी अभिनेत्री पुजा भट हिलाही डिप्रेशनमध्ये घेऊन गेले होते. त्या काळात ती खूप जास्त व्यसनाधिन झाली होती. ८. 'मोहाब्बते', 'धूम' यासारख्या चित्रपटांमधून उल्लेखनिय भूमिका साकारलेला अभिनेता उदय चोप्राही मागे काही वर्षे डिप्रेशनमध्ये हाेता. "आय एम नॉट ओके..", अशा शब्दांत त्याने सोशल मिडियावर पोस्ट टाकून त्याच्या मानसिक आजाराविषयी माहिती दिली होती. टॅग्स :आरोग्यमानसिक आरोग्यसेलिब्रिटीबॉलिवूडHealthMental Health TipsCelebritybollywood