1 / 7संसाररुपी गाडा ओढण्यासाठी नवरा आणि बायको (5 Celebrity Wives Who Supported Their Husbands Financially During Their Struggle Days) अशी दोन्ही चाकं फार महत्वाची असतात. एकमेकांच्या मदतीने आणि साथीनेच संसार यशस्वी होत असतो. त्यामुळे नवरा - बायको यांच्या नात्यांतील अतूट वीण ही कायमच अगदी घट्ट बांधलेली असावी लागते. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार घराचा आर्थिक भार हा नवरा संभाळत असतो तर स्त्री ही गृहिणी आणि घरातील इतर जबाबदाऱ्या सांभाळणारी असते. 2 / 7परंतु बदलत्या काळानुसार, आता स्त्रिया घर सांभाळून अर्थार्जनासाठी घराबाहेर पडून घराचा आर्थिक भार देखील तितक्याच सक्षमतेने सांभाळत आहेत. अशीच काहीशी गोष्ट आहे या बॉलिवूड मधील काही फेमस जोडप्यांची. ज्यांच्या स्ट्रगलिंगच्या कठीण काळात त्यांच्या पत्नीने घराची आर्थिक जबाबदारी सांभाळली होती. कोण आहेत ते कपल्स पाहूयात. 3 / 7अनिल कपूर यांच्या बॉलिवूडमधील स्ट्रगलिंगच्या काळात त्यांची बायको सुनीता कपूर हिने त्यांना साथ दिली. घरखर्च तसेच घरातील इतर बिलं भरण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. 4 / 7राम कपूर सांगतात, त्यांचे आणि गौतमीचे लग्न झाल्यानंतर पुढील एक वर्ष त्यांना इंडस्ट्रीत काहीच काम मिळत नव्हते. त्यावेळी संपूर्ण घरखर्च त्यांची बायको गौतमी हिनेच सांभाळला होता. लग्नांनंतर वर्षभर गौतमीने कमावलेल्या पैशांतूनच घर चालत असल्याचे त्यांनी म्हटले. 5 / 7अर्जुन बिजलानी सांगतो, जेव्हा माझे मोबाईल बिल भरायला देखील माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा माझी बायको नेहा स्वतः मोबाईल बिल भरायची. तेव्हा पासून अर्जुन बिजलानी आपल्या बायकोला आपली शक्ती, किंवा हीच माझी ताकद आहे असे समजतो. 6 / 7मनीष पॉल याच्या इंडस्ट्रीतील स्ट्रगलिंग काळात त्याचे घरभाडे देण्याइतकेही पैसे त्याच्याकडे नव्हते तेव्हा त्याच्या बायकोने त्याला उभं राहण्यासाठी भक्कम पाठिंबा दिला7 / 7पंकज उदास यांच्या अतिशय कठीण काळात त्यांची पत्नी फरीदा उदास हिने आर्थिक जबादारी निभावली होती. याबद्दल पंकज यांना तिचा फार अभिमान आणि कौतुक आहे.