1 / 7१. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने पुन्हा एकदा अभिमान वाटावा, अशी गोष्ट धडाकेबाज खेळाडू स्मृती मानधना हिच्या निमित्ताने घडून आली. तिला नुकतेच सलग दुसऱ्या वर्षी आयसीसी महिला ट्वेंटी- ट्वेंटी क्रिकेटर ऑफ दि इयर पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे.2 / 7२. तिच्यासोबत या यादीत पाकिस्तान, न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथील ३ खेळाडूंचाही समावेश आहे. 3 / 7३. २०२२ यावर्षी स्मृतीने खरोखरच दणकेबाज कामगिरी केली. त्यामुळेच या पुरस्कारासाठी तिची दखल घेतली गेली. 4 / 7४. २०२२ या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शानदार कामगिरी करत भारतीय महिला संघाने रौप्य पदक पटकाविले. यामध्ये संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिचा सिंहाचा वाटा होता. नेतृत्व आणि स्वत:चा खेळ या दोन्ही बाबतीत ती अगदी सरस ठरली होती.5 / 7५. नेहमीच चमकदार कामगिरी करणाऱ्या स्मृतीला आयसीसीने डिसेंबर २०१८ या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रॅचेल हेहो- फ्लिंट पुरस्कार देऊन गौरविले होते. त्याच वर्षी तिची वन डे प्लेयर ऑफ दि इयर म्हणूनही निवड करण्यात आली होती.6 / 7६. स्मृती मुळची मुंबईची. तिचे वडील माजी जिल्हा खेळाडू होते. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच स्मृतीने आणि तिच्या भावानेही क्रिकेट खेळावे, अशी त्यांची इच्छा होती. पालकांची प्रेरणा आणि मोठ्या भावाचे खेळणे पाहून स्मृतीनेही या क्षेत्रात तिची चमक दाखवली आणि अवघ्या ९ व्या वर्षी तिची १५ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली.7 / 7७. २०१३ साली तिला पहिल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हा सामना बांग्लादेशविरुद्ध झाला होता. तेव्हापासून सुरू असलेली तिची चमकदार कामगिरी अजूनही कायम आहे.