Harnaaz Sandhu Body shaming : हरनाजपासून सोनाक्षी, तब्बूपर्यंत 'या' अभिनेत्रींना झेलावं लागलं बॉडी शेमिंग; वजनामुळे तर कोणाला रंगामुळे हिणवलं Published:December 14, 2021 12:24 PM 2021-12-14T12:24:15+5:30 2021-12-14T13:23:30+5:30
Harnaaz Sandhu Body shaming : फक्त हरनाजच नाही तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना कधी आपल्या वजनावरून तर कधी रंगावरून लोकांनी हिणवलं नेहमी ट्रोल केले गेलं. इंडियन गर्ल हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) यंदाचा मिस युनिव्हर्सचा (Miss Universe 2021) खिताब जिंकला असून तब्बल 21 वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला आहे. एक काळ असा होता की हरनाजची तिचं वजन कमी असल्यामुळे खिल्ली उडवली जायची. कमी वजनामुळे तिला खूप तणाव जाणवत होता. यावर तिने सकारात्मक मानसिकता ठेवून मात केली. ती म्हणाले की, यातून बाहेर पडण्यासाठी आपण अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे ज्याच्याशी आपण मोकळेपणाने बोलू शकतो. यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिला
फक्त हरनाजच नाही तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना कधी आपल्या वजनावरून तर कधी रंगावरून लोकांनी हिणवलं नेहमी ट्रोल केले गेले. अजूनही अनेकजणी रोजच्या बॉडीशेमिंगला वैतागून नैराश्यात जातात. अनेक सिने अभिनेत्रींनी याकडे सकारात्मकतेनं पाहिलं आणि लोकांसाठी आत्मविश्वासाचं उदाहरण ठरल्या. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता.
शहनाज गिल
लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या शहनाज गिलला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते. जेव्हा शहनाज गिल बिग बॉसमध्ये आली तेव्हा घरातच नाही तर बाहेरही लोक तिच्या लठ्ठपणाबद्दल बोलायचे, पण घरातून बाहेर पडताच शहनाजच्या लूकमध्ये अमूलाग्र बदल झाला. जवळपास 6 महिन्यांत या अभिनेत्रीने आपल्या झिरो फिगरने सर्वांना आश्चर्यचकित केले.
रूबिना दिलैक
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक काही काळापूर्वी कोरोना व्हायरसची शिकार झाली होती. त्यामुळे अभिनेत्रीचे वजन खूप वाढले होते आणि तिला लठ्ठपणामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. एवढेच नाही तर काही लोकांनी त्याला हेट मेल आणि मेसेजही पाठवले. याचे उत्तर अभिनेत्रीने अतिशय चोखपणे दिले असले तरी लोकांच्या या कृतीमुळे तिच्या भावना दुखावल्याची एक पोस्ट तिनं लिहिली आहे.
हिना खान
बॉलीवूडवर राज्य करणारी अभिनेत्री हिना खानलाही बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. वडिलांच्या निधनानंतर हिना खान खूप वाईट अवस्थेतून जात होती, त्यामुळे तिने काही काळ प्रकृतीकडे लक्ष दिले नाही आणि तिचे वजन वाढले होते. तेव्हापासून हिनाने फिट होण्याच्या मार्गावर जाण्यास सुरुवात केली.
रश्मी देसाई
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने स्वतः खुलासा केला की, तिला अनेकदा आकार, मेकअप, कपड्यांवरून ट्रोल केले जाते. रश्मीने ट्रोलरच्या या टीकेला आव्हान म्हणून घेतले आणि त्यांची बोलती बंद केली.
हिमांशी खुराणा
पंजाबची ऐश्वर्या म्हणजेच हिमांशी खुराणा देखील तिच्या वजनाबाबत सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली होती. हिमांशी खुरानाने एंट्री केली तेव्हा लोकांनी तिच्या वजनाचीही खिल्ली उडवली, पण ट्रोल होऊन उदास होण्याऐवजी हिमांशीने तिचा लूक अधिक आकर्षक बनवला आहे.
आशिका भाटिया
आशिका भाटिया फॅट शेमिंगची सर्वाधिक शिकार झाली आहे. तिचा जवळपास प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट आक्षेपार्ह कमेंट्सने भरलेला आहे. परंतु अभिनेत्रीने अतिशय हूशारीनं सर्वांची तोंडं बंद केली.
विद्या बालन
अभिनेत्री विद्या बालनला तिच्या शरीर आणि लठ्ठपणामुळे अनेकवेळा लाजिरवाण्याला सामोरे जावे लागले होते. तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. तिने अखेर स्वत:ला जसं आहे तसं स्वीकरालं. डीएनएशी संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली होती की, ''मी काय परिधान करावे, मी कसे दिसावे याबद्दल अनेकजण मत देत असतात. हे सर्व वेदनादायक आहे. मी पूर्वी या गोष्टीवर नाराज व्हायचे, पण जेव्हा मी त्रास करून घेणं बंद केलं तेव्हा लोकांनी ते बोलणे बंद केले.''
ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय बच्चनला तिच्या प्रेग्नेंसीनंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिच्या वजन आणि लूकमुळे तिला ट्रोल व्हावे लागले होते. मात्र, ऐश्वर्याने त्याचा मोठ्या आत्मविश्वासाने सामना केला. ती एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'तुम्ही मला हवे तितके ट्रोल करू शकता.'
एकेकाळी सोनाक्षी सिन्हाच्या लठ्ठपणाची मॉडेलने खिल्ली उडवली होती. त्या मॉडेलने सोनाक्षीला गाय म्हटले होते. दररोज महिलांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. एका शोमध्ये, अभिनेत्रीने रॅपिड फायर राउंडमध्ये खुलासा केला होते की, अनेकदा तिला जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे ट्रोलिंगला तोंड द्यावं लागलं होतं.