श्रीलंकेची दाणादाण उडवणारी भारतीय संघाची तोफ रेणुका सिंग ठाकूर! बघा रेणुकाच्या कमाल संघर्षाचा प्रवास By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 6:25 PM 1 / 8१. भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच श्रीलंकेचा दणक्यात पराभव केला आणि यावर्षीच्या एशिया कपवर भारताचे नाव काेरले. संघातील सगळ्याच खेळाडूंनी उल्लेखनिय कामगिरी केली. पण केवळ ५ रन देऊन ३ महत्त्वाच्या विकेट घेणारी रेणुका सिंग ठाकूर प्लेअर ऑफ द मॅचची मानकरी ठरली..2 / 8२. नेहमीच अशी दणकेबाज कामगिरी करणारी रेणूका भारतीय महिला क्रिकेट संघाचा तोफखाना म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपुर्वी झालेल्या राष्ट्रकुट स्पर्धेतली रेणुकाने सलग दोन सामन्यांमध्ये प्रत्येकी ४- ४ बळी घेत भारतीय संघाचे स्थान मजबूत केले होते. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिलीच महिला गोलंदाज ठरली. 3 / 8३. रेणुका ही मुळची हिमाचल प्रदेशमधील पारसा या गावची. ती अवघी ३ वर्षांची असताना तिचे वडील वारले. त्यावेळी तिचा मोठा भाऊ ६ ते ७ वर्षांचा होता. कुटूंबाचा सगळा भार आईवर आला. अतिशय हालाखीत दिवस काढून आता रेणुकामुळे या कुटूंबाला पुन्हा चांगले दिवस पाहायला मिळत आहेत.4 / 8४. रेणुकाच्या वडिलांना मुळात क्रिकेटची खूप आवड होती. विनोद कांबळीचे ते मोठे चाहते. त्यामुळेच त्यांनी मोठ्या मुलाचे नाव विनोद ठेवले होते. आपल्या मुलीनेही क्रिकेटर व्हावे, असे त्यांना वाटायचे. वडिलांचे हे स्वप्न नंतर रेणुकाने पुर्ण केले. त्यासाठी तिला तिचे काका भुपेंद्र सिंह यांनीही वेळोवेळी मदत केली.5 / 8५. शाळेत असल्यापासूनच ती शाळेच्या संघाकडून क्रिकेट खेळायची. नंतर महाविद्यालयात असताना १६ आणि १९ वर्षांखालील हिमाचल प्रदेश महिला क्रिकेट संघाचे तिने प्रतिनिधित्व केले आणि तिथून तिची वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू झाली.6 / 8६. नंतर २०१९- २० मध्ये झालेल्या महिला क्रिकेट लीगमध्ये तिने सर्वाधिक २३ बळी घेतले, यानंतर सगळ्या जगाचेच लक्ष तिच्याकडे वेधले गेले.7 / 8७. २०२० साली तिला भारतीय महिला संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि तिने तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियासोबत खेळला. यानंतर झालेल्या प्रत्येक स्पर्धेतच तिच्या यशाचा आलेख उंचावत राहिला.8 / 8८. तिची ही कामगिरी बघून तिला भारतीय रेल्वेत नोकरीही देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications