नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

Updated:March 27, 2025 17:33 IST2025-03-27T17:27:25+5:302025-03-27T17:33:25+5:30

IPS Tanushree : तनुश्री यांचं २०१५ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं.

नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

लग्नानंतर बहुतेक महिला नोकरी सोडतात किंवा काही दिवसांसाठी ब्रेक घेतात. कारण घर सांभाळणं आणि बाहेरचं काम एकाच वेळी करणं कठीण होतं. तर अनेक महिला दोन्ही कामं खूप चांगल्या प्रकारे हाताळतात, ज्यामध्ये त्यांचं कुटुंब त्यांना पाठिंबा देतं.

नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

महिला लग्नानंतर आपली स्वप्नं पूर्ण करतात हे आयपीएस तनुश्री यांनी सिद्ध केलं आहे. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. तनुश्री यांचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी बिहारमधील मोतिहारी येथे झाला.

नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

शालेय शिक्षण डीएव्ही पब्लिक स्कूलमधून केलं. त्यांचे वडील सीआरपीएफमध्ये डीआयजी होते. अशा परिस्थितीत त्यांना लहानपणापासूनच शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा मिळाली. त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

तनुश्री यांचं २०१५ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. कुटुंबाची काळजी घेत यूपीएससीची तयारी केली. २०१६ मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली आणि २०१७ मध्ये त्या आयपीएस अधिकारी झाल्या.

नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

एजीएमयूटी कॅडरच्या २०१७ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान येथे एसएसपी (वरिष्ठ पोलिस अधीक्षक) म्हणून काम केलं आहे. सध्या ते काश्मीरमधील राज्य तपास संस्थेत (SIA) एसपी म्हणून तैनात आहेत.

नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

तनुश्री असिस्टंट कमांडंट देखील राहिल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आयपीएस अधिकारी व्हायचं होतं आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले.

नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

तनुश्री यांना आयपीएस होण्याची प्रेरणा त्यांच्या मोठ्या बहिणीकडून मिळाली ज्या सीआरपीएफमध्ये कमांडंट आहे.

नेत्रदिपक भरारी! लग्नानंतर संसार अन् अभ्यास केला मॅनेज; दमदार कामगिरी करत झाली IPS अधिकारी

घर, अभ्यास आणि या मोठ्या पदासोबतच तनुश्री सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.