Join us   

'....म्हणून लोक कितीही हसले तरी मिशी कापणार नाही'; मिशीवाल्या बाईची भन्नाट कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 3:52 PM

1 / 9
मुलं किशोर वयात येईपर्यंत त्यांच्या दाढी-मिश्या येऊ लागतात. हल्ली सिनेस्टार्समध्ये दाढी-मिश्यांची क्रेझ इतकी वाढली आहे की, प्रत्येक मुलाला दाढी-मिशी ठेवायची असते. मात्र, काही वेळा मुलांमध्ये हार्मोन्सचं संतुलन बिघडल्यामुळे दाढी-मिशी येत नाहीत. महिलांमध्ये हार्मोन्स बदलामुळे चेहऱ्यावर जास्त केस दिसू लागतात. (woman with mustache) महिलांच्या ओठ्यांच्या वरच्या भागावर जे केस येतात त्यांना अप्पर लिप्स म्हणतात. (This woman puts on her mustache people make fun)
2 / 9
महिला आपल्या चेहऱ्यावरील हे केस क्रीम, वॅक्सच्या पट्ट्या, रेझर आणि एपिलेटर इत्यादींनी काढतात. पण भारतात एक बाई अशा आहेत. ज्यांना पुरूषाप्रमाणे मिश्या असून त्यांना या मिश्या ठेवायला खूप आवडतं. त्या कधीच आपल्या मिशा कापत नाहीत. लोकांची पर्वा न करता या स्वत:ची इच्छा जपत आपल्या मिशांवर प्रेम करतात. (Indian woman shyja who flaunts her moustache upper lips hair facial hair)
3 / 9
शायजा असे या मिशीवाल्या बाईंचं नाव असून त्या केरळमधील कन्नूरच्या रहिवासी आहेत. ३५ वर्षीय शायझा यांच्यावर अनेकदा मिशीवरच्या केसांवरून विनोद करण्यात आले. पण तरिही त्यांनी मिशी ठेवणारच असा निर्धार केला.
4 / 9
एका मुलाखतीदरम्यान शायजा म्हणाल्या की, “मला मिशा ठेवायला आवडतात, त्यामुळे मी त्या कधीच कापणार नाही. अनेक महिलांप्रमाणे माझ्याही चेहऱ्यावर जास्त केस होते. पण केस काढायची गरज मला कधीच वाटली नाही. पाच वर्षांपूर्वी मिशांचे केस दाट होऊ लागले. मी आता मिश्यांशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. (Konnur women in love with her moustache, makes a style statement)
5 / 9
शायझा यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, ''कोरोना महामारीच्या काळात मला सतत मास्क घालावा लागत होता. मला मास्क घालणे कठीण वाटत होते. यामुळे अनेकांनी मिशा कापायला सांगितलं. त्यावेळीही मी मिशा कापण्याचा विचार केला नाही. कारण माझ्या मिशांमुळे माझ्या सुंदरतेत काही फरक पडतो असं मला वाटत नाही.''
6 / 9
शायझा यांच कुटुंब आणि त्यांची मुलं त्यांना प्रत्येक गोष्टीत पाठींबा देतात. त्यांची मुलं त्यांना अनेकदा सांगतात की मिशा खूप सुंदर दिसतात. शायझा यांनी रस्त्यावर वावरत असताना लोकांकडून टिंगल, टोमणेही बरेच एकले. पण लोकांच्या चेष्ठेमुळे त्यांना काही फरक पडत नाही.
7 / 9
शायजा सांगतात की, 'माझ्याकडे २ आयुष्य असती तर मी एक आयुष्य इतरांसाठी जगले असते. आतापर्यंत माझ्या ६ वेळा सर्जरीज झाल्या आहेत. मागच्या काही वर्षात ब्रेस्टमध्ये गाठ असल्यानं सर्जरी करावी लागली नंतर अंडाशयातील अल्सर काढण्यासाठी सर्जरी झाली. जवळपास पाच वर्षांपूर्वी हिस्टेरेक्टॉमी ही माझी शेवटची सर्जरी झाली.
8 / 9
जेव्हाही माझी कोणतीही शस्त्रक्रिया असायची तेव्हा मला वाटायचे की ही माझी शेवटची शस्त्रक्रिया आहे आणि त्यानंतर मला कधीही ऑपरेशन थिएटरमध्ये जावे लागणार नाही. बर्‍याच शस्त्रक्रियांनंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मला वाटले की मी आनंदी जीवन जगू शकते.''
9 / 9
शायजा यांच्या म्हणण्यानुसार, त्या लहानपणापासून खूप लाजाळू होत्या आणि त्यांच्या गावातील महिला संध्याकाळी 6 नंतर घरातून बाहेर पडत नव्हत्या. त्यांच्या गावात महिलांना घरातून बाहेर पडण्याची आणि घराबाहेर बसण्याचीही परवानगी नव्हती. पण लग्न झाल्यावर त्या तामिळनाडूत सासरच्या घरी गेल्या. तिथे त्यांना भरपूर सवलती मिळाल्या. त्यांचे पती कामावर जायचे आणि त्यांना काही लागलं तर त्या रात्री एकट्या दुकानात जायच्या. त्या कोणावर अवलंबून न राहता स्वतः काम करायला शिकल्या आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढला. (Image Credit- Social Media)
टॅग्स : सोशल व्हायरलसोशल मीडिया