नवीन वर्षात भरपूर यश मिळेल-समाधानी राहाल; लक्षात ठेवा डॉ. कलामांनी सांगितलेले यशाचे ८ मंत्र Published:December 29, 2023 03:33 PM 2023-12-29T15:33:38+5:30 2023-12-30T13:17:25+5:30
New Year Resolution : कोणतंही यश मिळाल्यानंतर तुम्ही त्या यशाचा आनंद घेत बसलात तर दुसरं यश मिळू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा मेहनत करा. यशानं हूरळून जाऊ नका. नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. (New Year Resolution) नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रत्येकजण काहीतरी संकल्प ठरवतो. येत्या वर्षात आपण जास्तीत जास्त पैसे कमवावेत, यशस्वी व्हावं, फिटनेस मेंटेन ठेवावा असं वाटतंच. पण प्रयत्न कमी पडतात. वर्ष अखेरीस असं वाटतं की आपण काहीच केलं नाही. तसं होऊ नये म्हणून माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी सांगितलेले यशाचे ८ मंत्र कायम लक्षात ठेवा. (Special Thoughts of Dr. APJ Abdul Kalam)
१) मेहनत करत राहा फळ नक्कीच मिळेल
मेहनत करणं आपल्या हातात असतं, त्यात कमी पडायचं नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही म्हणून प्रयत्न करणं सोडायचं नाही. फळ नक्की मिळतं, मात्र आपला संयम कधीही सोडायचा नाही.(Motivational Thoughts of Dr Abdul Kalam New Year Motivational Thoughts)
२) प्रयत्न करत रहा, हार मानू नका
कोणतंही यश मिळाल्यानंतर तुम्ही त्या यशाचा आनंद घेत बसलात तर दुसरं यश मिळू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा मेहनत करा. यशानं हूरळून जाऊ नका.
३) स्वप्न पाहा
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वप्न पाहणं फार महत्वाचे असते. झोपेत पडतात ती खरी स्वप्न नव्हेत, आपल्याला झोपून देत नाहीत अशी स्वप्नं म्हणजे खरी स्वप्नं.
४) अपयशही काही चुकीचं नाही.
जीवनात अपयश येणंही गरजेचं असतं. कारण अपयश आल्याशिवाय आपण पुन्हा यशस्वी होण्य्साठी प्रयत्न करत नाहीत.
५) सुर्याकडून शिका
सूर्याचा प्रकाश दिसतो त्याचं सदासर्वदा आगीत जळणं-उजळणं दिसत नाही. त्यामुळे आपल्यातली प्रयत्नांची आग कायम शाबूत ठेवा.
६) सामर्थ्य
कोणताही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सामर्थ्य असणं फार महत्वाचे असते. ती क्षमता कमावणं अतिशय महत्त्वाचं. शिकत राहा.
७) २ शिक्षक
आपल्या आयुष्यातले २ सगळ्यात मोठे शिक्षक. वेळ आणि आयुष्य. जीवनात वेळेचा सदूपयोग करा.
८) आत्मविश्वासाचे औषध
आत्मविश्वास आणि मेहनत हे अपयश नावाच्या आजारावर उत्तम औषध आहे. या औषधाने तुम्ही तुमच्या आयुष्यात सफल बनू शकता.