1 / 8ज्या देशात मुलींनी खेळणंच महत्त्वाचं मानलं जात नाही, त्या देशातल्या या मुलींनी ऑलिम्पिक पदक जिंकत दाखवून दिलं आपण सर्वोत्तम आहोत. आतापर्यंत भारताने ऑलिम्पिकमध्ये ३५ पदकं जिंकली आहेत. त्यापैकी ७ पदकं महिला खेळाडूंनी जिंकून आणली आहेत.2 / 8कर्णम मल्लेश्वरी यांनी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलन खेळात कांस्य पदक पटकावलं आणि इतिहास घडवला. त्या ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिला भारतीय महिला खेळाडू ठरल्या.3 / 8त्यानंतर खूप मोठी प्रतिक्षा करावी लागली आणि तब्बल १२ वर्षांनी सायना नेहवालच्या रुपात भारताला बॅडमिंटन खेळात दुसरं ऑलिम्पिक कास्यं पदक मिळालं.4 / 8त्याचवर्षी म्हणजेच २०१२ मध्येच मेरी काेम यांनीही भारतासाठी कास्यं पदक जिंकलं. ते वर्ष भारताच्या महिला खेळाडूंनी गाजवलं..5 / 8यानंतर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा बॅडमिंटन खेळात भारताचं नाण खणखणलं आणि पी. व्ही. सिंधूने रजत पदक जिंकलं. 6 / 8कुस्ती हा आपल्याकडचा पुरुषप्रधान खेळ. पण यामध्ये वर्चस्व गाजवत साक्षी मलिक हिने २०१६ च्या स्पर्धेत कास्यं पदक जिंकून भारताची आणि भारतातील सगळ्याच कुस्तीपटूंची मान उंचावली. 7 / 8यानंतर २०२० मध्ये मीराबाई चानू यांनी भारताला रजत पदक मिळवून दिलं. 8 / 8२०२० मध्येच कुस्ती खेळात लवलीना बोरगोहांईने कांस्य पदक जिंकलं. २०२० मध्ये भारतीय महिला खेळाडूंनी पदकांची हॅट्रिक केली आणि पी. व्ही. सिंधू हिच्या नावावर आणखी एक कांस्य पदक नोंदवलं गेलं.