Join us   

अपघातात पाय गमावले पण हिंमत नाही! सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा म्हणते, स्वप्न पाहण्याची हिंमत केली कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2024 6:05 PM

1 / 8
अवनी लेखरा. एक नाही तर दोन पॅराऑलम्पिक मेडल जिंकत या मुलीने सिद्धच केलं आहे की मनात आणलं तर काहीही अशक्य नाही. जिद्द आणि मेहनत मात्र हवी, फोकस त्याहून मोठा हवा आणि आपल्या क्षमता वापरुन जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा हवी. अवनी म्हणजे जिद्दीसह मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे (Shooter Avani Lekhara Becomes First Indian Woman To Win Two Gold Medals).
2 / 8
पॅरिस पॅराऑलम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराने सुवर्णपदक जिंकलं. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी टोकियो पॅराऑलम्पिकमध्ये याच स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते.
3 / 8
अवनीने सुवर्णपदक जिंकताच यंदा ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच भारताचे राष्ट्रगीत वाजले. तो सन्मान आणि अभिमानाचा क्षण अवनीने देशासाठी जिंकला.
4 / 8
(Avani Lekhara)अवनी, राजस्थानच्या जयपूरची. ती फक्त ११ वर्षांची असतानाची गोष्ट. २०१२ साली एका मोठ्या कार अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली. स्पायनल कॉर्डला इजा झाली. या अपघातात तिला अपंगत्व आले.
5 / 8
सोपं कसं असेल मोठं होताना आपले पायच नसल्याची भावना घेऊन जगणं. पण अवनीचे वडील तिच्या पाठीशी होते. लेकीची जिद्द पाहून त्यांनी तिला खेळाची गोडी लावली. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अभिनव बिंद्राने लिहिलेले आत्मचरित्र अवनीने वाचले. त्याला आदर्श मानून तिनं आपला नेमबाजीचा सराव सुरू केला.
6 / 8
साधारण २०१५ पासून अवनीने शूटिंगचा सराव सुरू केला. वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. सुरुवातीला अवनीने शूटींग आणि तिरंदाजी दोन्ही खेळात उत्तम प्रगती दाखवली. पण तिला शूटिंगमध्ये अधिक रस होता. २०१५ मध्ये पहिल्यांदा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. त्यानंतर तिचा शुटिंगचा प्रवास सुरु झाला.
7 / 8
शुटिंगसोबतच अवनी अभ्यासातही हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जयपूरच्या केंद्रीय विद्यालयातून झाले आहे. तिचा शूटिंगचा प्रवासही येथूनच सुरू झाला. ती सध्या राजस्थान विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे.
8 / 8
अवनी लेखरा (Avani Lekhara) ३ पॅरालिम्पिक पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे
टॅग्स : प्रेरणादायक गोष्टीपॅरिस ऑलिम्पिक २०२४