Rani Rampal : प्रचंड गरीब घरात लहानाची मोठी झाली भारतीय हॉकीची 'राणी'; इच्छाशक्तीमुळे आज बनली कोट्यवधींची प्रेरणा By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:12 PM 1 / 6 जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून कोणतंही काम करायचं ठरवते तेव्हा अशी कोणतीच शक्ती नाही जी तिला अडवू शकेल. आज आम्ही तुम्हाला भारतीय महिला हॉकी टिमची कर्णधार राणी रामपालच्या संघर्षाबाबत सांगणार आहोत. हॉकीच्या राणीचा प्रवास जगभरातील स्त्रियांसाठी प्रेरणादायक आहे. (Image Credit- Wiki Folder)2 / 6टोकियो ओलिम्पिक्समध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर महिला हॉकी टीम ब्रॉन्ज मेडल जिंकू शकली नाही पण सेमीफायनलमध्ये स्वतःचे वेगळं स्थान निर्माण करून इतिहास रचला. गरिबी आणि आर्थिक परिस्थिती हालाखिची असतानाही टोकिओ ओलिम्पिक्समध्ये भारतीय महिला हॉकी टिमची जबाबदारी स्विकारण्यापर्यंत तिचा प्रवास कौतुकास्पद आहे. 3 / 6राणी रामपालने इतकी मोठी कामगिरी एका रात्रीत केली नाही. यासाठी त्याने वर्षानुवर्षे कष्ट केले आणि घाम गाळला. राणी मुळची हरियाणातील शाहबाद मार्कंडाची आहे. तिच्या कुटुंबाला दोन वेळच्या जेवणासाठीही खूप संघर्ष करावा लागायचा. घर चालवण्यासाठी तिचे वडील घोडा गाडी चालवायचे.4 / 6दिवसाला १०० रूपये कमावणंसुद्धा अवघड व्हायचं. मोठ्या कष्टाने कुटुंबातील सदस्यांनी राणीला शाळेत प्रवेश मिळवून दिला. जेव्हा राणी 6 ते 7 वर्षांची होती. तेव्हा तिला इतर मुलांना मैदानात पाहून हॉकी खेळण्याची आवड निर्माण झाली. तिनं वडिलांसमोर हॉकी खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यावेळी वडीलांचा यासाठी पाठींबा नव्हता. कारण त्या काळात मुलींनी हॉकी खेळणे ही मोठी गोष्ट होती.5 / 6खूप प्रयत्न केल्यानंतर तिला अखेर शाहबाद हॉकी अकादमीमध्ये दाखल करण्यात आले. एका मुलाखतीत राणीनं सांगितले की - 'माझ्या कुटुंबाकडे प्रशिक्षणासाठी पैसे नव्हते. यामुळे मी अनेक वेळा हॉकी सोडण्याचा विचार केला. या कठीण परिस्थितीत माझे प्रशिक्षक बलदेव सिंह आणि वरिष्ठ खेळाडूंनी मला साथ दिली. त्यांनी मला खूप मदत केली.' 6 / 6राणी रामपालचे जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देते की उच्च इच्छाशक्तीच्या बळावर आपण कोणत्याही परिस्थितीशी लढू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications