Salute to Zulu! The maximum of hard work won by the stubbornness of cricket crazy girl...
सलाम झुलू दी! क्रिकेटवेड्या मुलीच्या जिद्दीने जिंकलेल्या कष्टांची कमाल...Published:September 25, 2022 12:55 PM2022-09-25T12:55:35+5:302022-09-25T13:26:23+5:30Join usJoin usNext Jhulan Goswami Retirement From International Cricket last Match England एका लहान गावातून, सामान्य कुटुंबातून आलेली खेळाडू म्हणजे झुलन गोस्वामी. भारतीय महिला क्रिकेटचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारी आणि या प्रवासात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वत:चे स्थान सिद्ध करणारी म्हणून तिची ओळख आहे (Jhulan Goswami Retirement From International Cricket last Match England). भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून झुलन तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दितील शेवटची मालिका याठिकाणी खेळली. या मालिकेत यश मिळवत झुलनला निरोप द्यायचा असा चंग संघातील खेळाडूंनी बांधला होता, त्याप्रमाणे त्यांनी यश खेचून आणले. इंग्लंडसोबत शेवटची मॅच खेळताना झुलनने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, २०१७ नंतर भारतीय महिला क्रिकेटचा खऱ्या अर्थाने उदय झाला आणि त्यानंतर हळूहळू भारतात महिला क्रिकेटची पायाभरणी झाली असं म्हणता येईल. आता तरुणी क्रिकेटकडे करीअरची संधी म्हणून निश्चितच पाहू शकतात. भारताचा जर्सी घालून देशाचे राष्ट्रगीत ऐकणे हा माझ्या आयुष्यातील अतिशय उत्तम क्षण असेल जो मी अनुभवला. बंगालमधल्या नादिया जिल्ह्यातील ‘छकडा’ हे तिचं गाव. त्याच नावानं ती छकडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. झुलनला तिच्या संघसहकारी ‘गुझी’ म्हणतात. बाबूल असंही तिचं एक निकनेम आहे. तिचं ते सुंदर स्माईल आणि सदैवर हसतमुख चेहरा ही तिची ओळख आहे. २००२ साली तिचं भारतीय संघात पदार्पण झालं. आणि एक उत्तम ऑलराउण्डर म्हणून तिचा उदय झाला. ती उत्तम बॉलर तर होतीच पण तिची बॅटही झकास काम करते. झुलन काही एका रात्रीत सेलिब्रिटी खेळाडू झाली नाही. तर त्यासाठी तिनं अपार मेहनत घेतली आहे. २००७ साली आयसीसीच्या उत्तम खेळाडूंच्या यादीत एकही भारतीय पुरुष क्रिकेटपटू नव्हता, त्यावेळी आसीसी प्लेअर ऑफ द इयर म्हणून गौरवलेली झुलन ही एकमेव क्रिकेटपटू. झुलनचा संघर्ष तिची जिद्दी आणि तिचं सातत्यपूर्ण पॅशन, हे सगळंच अत्यंत प्रेरणादायी आहे. संघाचा आधारस्तंभ असलेल्या झुलन गोस्वामीचा लवकरच बायोपिक येतो आहे. अनुष्का शर्मा त्यात झुलनची भूमिका करणार असून झुलनबरोबरच मिताली राजची दीर्घ कारकीर्द, महिला क्रिकेटला या दोघींनी दिलेला चेहरा हा सारा संघर्ष या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीझुलन गोस्वामीInspirational StoriesJhulan Goswami