डिप्रेशन आणि फ्लॉप सिनेमांच्या संकटांशी परिणीती चोप्रा झगडली, सध्या तिच्या लग्नाची चर्चा रंगतेय मात्र.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2023 2:39 PM 1 / 11इशकजादेमधील झोया कोणाला नाही ठाऊक, परिणीता चोप्राचा रोखठोक - चूलबुला स्वॅग अनेकांना भावला. तिने अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तिचं नाव सध्या खासदार राघव चड्ढासोबत जोडलं जात आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, तिने बोर्डात टॉप क्रमांक काढला होता(Top 10 Unknown Facts About Parineeti Chopra).2 / 11बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली परिणीती चोप्रा, इंटरनेटवर अनेक कारणांमुळे चर्चेत असते. तिचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ साली हरियाणातील अंबाला गावात झाला. परिणीती ही देसी गर्ल प्रियांका चोप्राची चुलत बहिण आहे. 3 / 11परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वात शिकलेली मुलगी आहे. बारावीच्या परीक्षेत ती पहिली आली होती. ज्यासाठी तिचा राष्ट्रपतींकडून सन्मानही करण्यात आला होता. तिने बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्स केले आहेत. यासह संगीतातही तिने बीए केले आहे, ती एक प्रशिक्षित गायिका असून, तिने गायलेलं ''माना के हम यार नही'' हे गाणं प्रचंड गाजलं. 4 / 11परिणीती १७ वर्षांची असतानाच उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं लंडनमध्येच 'इन्व्हेस्टमेंट बँकर' म्हणून काही वेळ नोकरी केली. पण मंदीचा फटका तिच्या नोकरीवर बसला. २००९मध्ये तिनं लंडनमधील नोकरी सोडली, अन् भारतात येण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर परिणीतीनं प्रियांकासारखंच बॉलिवूडमध्ये नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला.5 / 11भारतात परतल्यानंतर प्रियांकाने, तिची यशराज फिल्म्सशी ओळख करून दिली. इथे ती पीआर सल्लागार म्हणून काम करू लागली. दोन वर्ष काम केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली. तिने २०११ साली 'लेडीज वर्सेस रिकी बहल' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ज्यात तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.6 / 11यानंतर इशकजादे या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटातील तिचा रावडी अंदाज खूप चर्चेत राहिला. याशिवाय 'नमस्ते इंग्लैंड', 'केसरी', 'जबरिया जोड़ी', 'डिशूम', 'किल दिल' या चित्रपटात देखील तिने कमालीची भूमिका साकारली.7 / 11एकेकाळी परिणीती खूप ओव्हरवेट होती. पडद्यावर परफेक्ट दिसण्यासाठी तिने वजन कमी केलं. तिने ६ महिने काटेकोरपणे डाएट फॉलो केलं. ज्यात तिने साखर, कार्बोहायड्रेट आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्यास टाळले. यादरम्यान तिने सायंकाळच्या ८ वाजेनंतर डिनर करणं बंद केलं.8 / 11साल २०१४ ते २०१५ दरम्यान, परिणीती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे, ती आर्थिक संकटांना सामोरी जात होती. या काळात ती अधिक आजारी पडू लागली, व मिडियासमोर येण्यास ती टाळत होती. दरम्यान, भाऊ सहज चोप्रा आणि मित्र संजना, त्यांनी या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. 9 / 11परिणीती अभिनेता सैफ आली खानची खूप मोठी फॅन आहे. ती त्याच्यासोबत लग्न करण्यास देखील तयार होती. तिने या बाबतीत एका चॅट शोमध्ये त्याची पत्नी करीना कपूरला ही गोष्ट बोलून दाखवली.10 / 11सध्या परिणीतीचं नाव खासदार राघव चड्ढासोबत जोडलं जात आहे. तिला व राघव या दोघांना एका हॉटेलबाहेर स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर या दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. मात्र, दोघांनी या नात्यावर अद्याप कोणतंही स्पष्टीकारण दिलेलं नाही. 11 / 11राघव चड्ढा यांच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगण्यापूर्वी, तिने याआधी दोन सेलिब्रिटींना डेट केलं आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’चे दिग्दर्शक मनीष शर्मा व धर्मा प्रॉडक्शनचे असिस्टेंट डायरेक्टर चरित देसाई यांच्यासोबत तिचं नाव जोडण्यात आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications