देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

Published:January 23, 2022 12:57 PM2022-01-23T12:57:17+5:302022-01-23T14:08:14+5:30

Jacinda Ardern : पंतप्रधान पदासोबतच आईची भूमिका निभावणारी ते दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या पाठीशी उभी राहणारी खंबीर महिला...

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

तीन वर्षांपूर्वी जेसिंडा अर्डन (Jacinda Ardern) कोण हे आपल्यातील अनेकांना माहितही नव्हते. मात्र आज दुसऱ्यांना न्यूझीलंडच्या पंतप्रधान म्हणून त्या निवडून आल्या आहेत.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

आपल्या तीन वर्षांच्या दमदार कामगिरीने लेबर पार्टीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जेसिंडा यांनी देशातच नाही तर जगभरात नाव कमावले आहे.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

पंतप्रधान झाल्यानंतर जेसिंडा यांनी मुलीला जन्म दिला होता. बेनजीर भुट्टो यांच्यानंतर देशाच्या प्रमुखाने आपल्या कार्यकाळात मुलीला जन्म देणाऱ्या जेसिंडा या दुसऱ्या राष्ट्रप्रमुख (New Zealand Prime minister) आहेत.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

लहानग्या मुलीला संसदेत घेऊन येणाऱ्या जेसिंडा यांची जगभरात बरीच चर्चा झाली होती. कितीही उच्चपदावर कामगिरी करत असली तरी महिलेला एक आई म्हणून तिची जबाबदारी सांभाळावीच लागते. या घटनेनंतर सगळ्या पातळ्यांवर अतिशय सक्षमपणे लढणारी महिला म्हणून जेसिंडा यांची अतिशय कमी काळात ओळख निर्माण झाली.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये नुकतेच नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये मास्क लावण्याबरोबरच, मेळावे, समारंभ यांवरही बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जेसिंडा यांनी आपल्या स्वत:चे लग्न रद्द केले. त्यांच्या याच निर्णयावरुन सध्या त्यांची जगभरात चर्चा सुरू आहे.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

कोरोनाकाळात राजकीय नेत्यांकडच्या लग्नसमारंभांना झालेली गर्दी, नियमांची ऐशीतैशी सर्रास होताना दिसली, असे असताना न्यूझीलंडच्या पंतप्रधान आपले लग्नच रद्द करण्याचा निर्णय घेतात, मी सामान्य देशवासीयांपेक्षा वेगळी नाही म्हणतात, याची 'बातमी' होणं साहजिकच आहे.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

जेसिंडा या २०१७ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्या होत्या. त्यावेळी देशातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान म्हणून त्यांची वाहवा झाली होती. तसेच मजूर पक्षाला मोठा विजय मिळवून देणाऱ्या म्हणूनही त्यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

क्लार्क गेफोर्ड हा जेसिंडा यांचा मित्र असून तो टीव्ही होस्ट म्हणून कार्यरत आहे. ४० वर्षाच्या असलेल्या जेसिंडा यांची २०१९ मध्ये एका टीव्ही शो दरम्यान क्लार्क याच्याशी ओळख आणि नंतर मैत्री झाली. त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडल्याने या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

न्यूझीलंडमध्ये वारंवार दहशतवादी हल्ले होत असतात. जेसिंडा यांच्या कार्यकाळातही असे बरेच हल्ले झाले. ऑकलंडमधील एका मॉलमध्येही सप्टेंबर २०२१ मध्ये चाकू हल्ला झाला होता. त्यामागे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी या हल्ल्याचा संबंध असल्याचे जेसिंडा यांनी त्यावेळी सांगितले होते.

देशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...

सत्तेवर आल्यानंतर केवळ दीडच वर्षात न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींवर एका 'व्हाइट सुप्रमिस्ट'ने क्रुरपणे गोळीबार केला. हा न्यूझीलंडमध्ये झालेला सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता. हल्ल्यानंतर जेसिंडा आता काय करतात याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. हल्ल्याची बातमी कळाल्यानंतर जेसिंडा यांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा त्यांच्या डोक्यावर मुस्लिम संस्कृतीचे महत्त्वाचे प्रतीक असलेला हिजाब पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले होते.