1 / 11तुम्हीसुद्धा प्रचंड ओवरथिंकिंग करता का? करत असाल तर ते मानसिक संतुलनासाठी चांगले नाही. ओवरथिंकिंगमध्ये चांगले विचार डोक्यात येत नाहीत. वाईटच येत राहतात.2 / 11अतिरेक कोणत्याच गोष्टीचा चांगला नाही. विचारांचा सुद्धा. त्यामुळे अति विचार करणे नकोच. 3 / 11असे आठ जपानी उपाय आहेत. जे ओवरथिंकिंग पासून माणसाला वाचवतात.4 / 11इकिगाई - या शब्दाचा अर्थ जगण्याचे कारण असा आहे. आयुष्यात काय करायचे आहे. या विचारात मन रमवा. म्हणजे नको ते विचारच येणार नाहीत.5 / 11काइझेन- म्हणजे प्रगतीतील सातत्य. एकदाच मोठे होण्याची स्वप्न बघण्यापेक्षा, लहान लहान विजय मिळवत मोठे व्हा. ताण घेऊ नका.6 / 11शिनरीन-योकू - निसर्गात मन रमवा. मन शांत ठेवण्यासाठीचा सगळ्यात सोपा मार्ग निसर्गात जाणे हाच आहे. डोक्यातील नको ते विचार निघून जातात.7 / 11झाझेन - रोज थोडावेळ तरी ध्यान लावून बसा. विचारांचा गुंता सुटण्यास मदत होते. मनावर व विचारांवर ताबा ठेवता येतो.8 / 11वाबी-साबी - ज्या गोष्टी जमत नाहीत, त्या शिकायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा सगळंच करता येत असं कोणीच नाही.9 / 11किनतसूगी - याचा अर्थ असा आहे की, फुटलेल्या मातीची भांडी सोन्याने जोडणे. मतितार्थ असा की चुका सुधारा. असा संदेश ही पद्धत देते. चूक उगाळत बसण्यापेक्षा ती सुधारणे गरजेचे आहे.10 / 11हारागेइ - याचा अर्थ 'अंर्तमनाचा आवाज' असा आहे. कधी कधी मन सुचना देते मग तसच करा. ज्याला आपण 'गट फिलिंग' म्हणतो.11 / 11गामान - सहनशक्ती वाढवा. सतत चिडू नका. शांत राहून विचार करायला शिका. अति विचार करत बसण्यापेक्षा शांत राहून समस्या सोडवायचा प्रयत्न करा.