Join us   

ताणतणाव कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा, तज्ज्ञ सांगतात स्ट्रेस, टेन्शन कमी होऊन व्हाल रिलॅक्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2024 3:38 PM

1 / 8
आजकालच्या जगात ताणतणाव, टेन्शन सगळ्यांनाच आहे. अगदी शाळकरी विद्यार्थीही याला अपवाद नाहीत. अभ्यास, शिक्षण, करिअर, नोकरी, नातेसंबंध अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रत्येकालाच काही ना काही टेन्शन आहेच. कशाचा तरी स्ट्रेस असतोच.
2 / 8
एखाद्या गोष्टीचा खूप ताण घेऊन काही होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण तरी टेन्शन घेण्याची, स्वत:ला त्रास करून घेण्याची सवय काही जात नाही. कधीकधी स्ट्रेस खूपच त्रासदायक होऊ लागतो. अशावेळी इतर सगळा विचार सोडा आणि या ५ पैकी एखादा पदार्थ तरी अवश्य खा.
3 / 8
झीन्यूज यांनी दिलेल्या वृत्तानुसार एनसीबीआयमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार काही पदार्थांमध्ये असे काही घटक असतात जे ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करतात.
4 / 8
यापैकी पहिला पदार्थ आहे दही. दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक आणि कॅल्शियम हे घटक ताण कमी करण्यासाठी मदत करतात.
5 / 8
स्ट्रेस वाढल्यावर डार्क चॉकलेट खाऊन पाहा. त्यामध्ये असणारं कोको एंडोर्फिन हे केमिकल स्त्रवण्यास मदत करतं. त्यामुळे मग मूड आनंदी होण्यास आणि ताण कमी होण्यास मदत होते.
6 / 8
बदाम, अक्रोड, काजू, सुर्यफुलाच्या बिया हे देखील ताण कमी करण्यासाठी मदत करतात. त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ओमेगा ३ फॅटी ॲसिड यामुळे ताण कमी होतो.
7 / 8
चौथा पदार्थ आहे केळी. केळीमध्ये पोटॅशियम उत्तम प्रमाणात असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे तणाव कमी होतो. तसेच त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी ६ देखील स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात.
8 / 8
बेरी प्रकारच्या फळांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. ते स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात. टेन्शनमध्ये असल्यास १० ते १२ बेरी खा. यामुळे ताण कमी होऊन मूड सुधारण्यास मदत होईल.
टॅग्स : मानसिक आरोग्यअन्नहेल्थ टिप्स