कधी कधी मन खूप अस्वस्थ होतं, एन्झायटी वाढते? ५ पदार्थ खा- मन शांत होऊन रिलॅक्स वाटेल
Updated:December 27, 2024 16:23 IST2024-12-26T16:04:37+5:302024-12-27T16:23:28+5:30

आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप ताण आलेला असतो तेव्हा एन्झायटी वाढते. खूप अस्वस्थ हाेतं. आपण काय काम करतो आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे, हे सुद्धा सुचत नाही (food that helps to reduce anxiety or stress level). जेव्हा आपला स्ट्रेस वाढतो तेव्हा शरीरातील कोर्टिसोल cortisol हार्मोन्सची पातळीही वाढते.(5 Foods To Manage Anxiety Naturally)
कोर्टीसोल हार्मोन्सची वाढलेली पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही अन्नपदार्थ नक्कीच उपयुक्त ठरतात. त्यामुळे जेव्हा केव्हा तुमच्या मनावरचा ताण वाढलेला असतो, तेव्हा पुढे सांगितलेले काही पदार्थ नक्की खाऊन पाहा. मन शांत होण्यास निश्चित मदत होईल.(best trick to manage stress)
व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत असणारे लिंबुवर्गीय फळं कोर्टीसोल हार्मोन्सची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात.
एन्झायटी कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांमध्ये असणारे मॅग्नेशियमही खूप उपयुक्त ठरते. त्यातही पालकाची भाजी ही मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे.
शरीरातली झिंकची पातळी वाढली की कोर्टीसोल हार्मोन्सची पातळी आपोआप कमी होते. त्यासाठी जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा काजू खा. काजुमधून चांगल्या प्रमाणात झिंक मिळते.
जवस, अक्रोड यांच्यामधून मिळणारं ओमेगा ३ देखील स्ट्रेस, एन्झायटी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं.
चहा, कॉफी, हॉट चॉकलेट अशी पेयं प्यायल्यानेही एन्झायटी कमी होते. त्यामुळे स्ट्रेस वाढून डोकं भंजाळलं असेल तर लगेच कपभर चहा पिऊन टाका.. ताण कमी होईल.