Join us   

मूड गेलाय, काहीच करु नये असं वाटतं? ५ पदार्ख खा- हॅप्पी हार्मोन्स वाढून व्हाल आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 1:23 PM

1 / 6
बऱ्याचदा काही ना काही छोटी- माेठी घटना घडते आणि आपल्याला खूपच उदास वाटू लागतं. आपण मनातल्या मनात खूप नाराज होऊ लागतो. खरं पाहिलं तर तसं काही मोठं कारण नसतं. पण आपला मूडच नसतो. असं तुमच्याही बाबतीत कधी झालंच तर लगेचच स्वयंपाक घरात जा आणि शरीरातील हॅप्पी हार्मोन्सचं प्रमाण वाढविणाऱ्या या ५ पदार्थांपैकी तुम्हाला जे जे शक्य असतील ते खा...(foods that increase the secretion of happy hormone in our body)
2 / 6
ते पदार्थ नेमके कोणते याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली माहिती jist.news या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला पदार्थ आहे आपण नेहमी करतो ती खिचडी. सिरोटोनीन हा हॅप्पी हार्मोन स्त्रवण्यासाठी खिचडीमधले काही पदार्थ उपयुक्त ठरतात.
3 / 6
दुसरा पदार्थ आहे अक्रोड. अक्रोडमधून मेलॅटॉनिन मिळते. त्यामुळे झोप चांगली होते आणि फ्रेश वाटते.
4 / 6
अंजीरमुळेही शरीराला काही हॅप्पी कम्पाउंड्स मिळतात. एवढंच नाही तर लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात देणारे अंजीर तुम्ही तुम्हाला आवडत नसले तरीही खायलाच पाहिजेत, असं आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात.
5 / 6
चौथा पदार्थ आहे हरबरे. त्यातून भरपूर प्रोटीन्सही मिळतात. त्यामुळे मूड गेला असल्यास त्याचा जो पदार्थ तुम्हाला आवडत असेल तो करा आणि खा...
6 / 6
पाचवा पदार्थ आहे हळद. आपल्या स्वयंपाकात हळद असतेच.. ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी फंगल गुणधर्म असणारी हळद शरीराला अनेक हॅप्पी कम्पाउंड देते, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
टॅग्स : मानसिक आरोग्यअन्न