हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

Published:May 30, 2021 05:52 PM2021-05-30T17:52:25+5:302021-05-30T18:16:14+5:30

Harnam Kaur youngest woman to have full beard at 24 : सुरूवातीला निंदा आणि लोकांच्या टोमण्यांमुळे हरनामने स्वतःचे केस काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला.

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

केसांनी भरलेला चेहरा म्हणजेच दाढी मिशांचा पुरूष डोळ्यासमोर येतो. तोंडावरचं हेच वेगळेपण लिंगामधील फरकाची जाणीव करून देतं. सध्या सोशल मीडियावर एक दाढी मिशा असलेल्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. दाढी मिशा असलेली अशी महिला तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. या महिलेचं नाव हरनाम कौर असं आहे.

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

पूर्ण दाढी वाढवणारी सर्वात तरुण महिला म्हणून तिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आहे. या महिलेची दाढी सहा इंच इतकी मोजली गेली आहे, तिने 24 वर्ष 282 दिवसांच्या वयात हा विक्रम संपादन केला आहे.

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

आयुष्याच्या एका वळणावर हरनामला इतका न्यूनगंड आला होता की तिनं आपलं घर सोडलं आणि स्वतलःला काहीतरी करण्याच्या विचारात बाहेर पडली. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या भारतीय वंशाच्या शिख तरूणीला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा आजार होता.

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

२९ नोव्हेंबर १९९० रोजी जन्मलेल्या हरनामला प्रथम वयाच्या 11 व्या वर्षी तिच्या तोंडावरचे केस वाढत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिला वयाच्या 12 व्या वर्षी पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे निदान झाले. ही स्थिती अशी आहे जेव्हा बहुतेक स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सचं अति प्रमाण झाल्यानं केस वाढतात.

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

सुरूवातीला निंदा आणि लोकांच्या टोमण्यांमुळे हरनामने स्वतःचे केस काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला. पण काळानुसार तिनं आपल्या मुळ स्वरूपाचा स्वीकार केला आणि स्वतःच्या शरीराबाबत सकारात्मक विचार करायला सुरूवात केली.

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

चर्चेत येण्यापूर्वी ती आपल्या विशिष्टतेसाठी टीचिंग असिस्टंट म्हणून काम करत होती. (Image Credit- Emirates 24/7)

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

२०१४ मध्ये लंडन फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करणारी ती दाढी असलेली पहिली महिलाही ठरली. (Image Credit- tomatoheart)

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

आता, तीनं बर्‍याच ब्रँड आणि उत्पादनांनासाठी काम केलं आहे. ती तिचे विचार, भावना आता सोशल मीडिया चॅनेल, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब च्या माध्यमातूनही व्यक्त करते.

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

आत्म-प्रेम आणि स्वीकृती वाढविण्यासाठी कौरने म्हटले आहे की तिने आपले दाढी सुंदरी ठेवली आहे, ज्याचा अर्थ सौंदर्य किंवा सुंदर आहे, आणि तिच्या दाढीचा उल्लेख 'ती' म्हणून केला जातो.(Image Credits: Harnaam Kaur/Instagram)

हरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का?

(Image Credit: Guinness World records, Google)