दिवसभरातील कामाचा स्ट्रेस काही मिनिटांत निघून जाईल; ५ टिप्स, मूड राहील फ्रेश-आनंदी By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 6:00 PM 1 / 7 रोजची दगदग कामाचा स्ट्रेस आजकाल खूपच कॉमन झालंय. ऑफिसच्या कामाचा स्ट्रेस घरी आल्यानंतरही जाणवतो. त्यामुळे रात्री लवकर झोपही लागत नाही आणि दिवसभर हेक्टीक वाटतं. (Stress Management) काहींना वर्कलोड सहन होत नाही, काहींना प्रवास हेक्टीक वाटतो तर काहींना ऑफिस पॉलिटिक्सचा सामना करावा लागतो. म्हणूनच या लेखात ऑफिसच्या कामाचा जास्त ताण येऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स पाहूया जेणेकरून तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. (How to Deal With Office Stress)2 / 7अनेकांना कामाचा लोड खूप असल्यानं सतत चिडचिड होते किंवा मूड फ्रेश राहत नाही. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर जितकं होईल तितकंच काम करा. जास्तीच्या कामाची कमिटमेंट देऊ नका. (How to Manage Stress at Wor) जर तुम्हाला सिनिअर्स जास्त काम देत असतील तर तुम्ही आधीच ओव्हर बर्डन असल्याचं त्यांना सांगा.3 / 7अनेकांना कामाचा लोड खूप असल्यानं सतत चिडचिड होते किंवा मूड फ्रेश राहत नाही. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर जितकं होईल तितकंच काम करा. जास्तीच्या कामाची कमिटमेंट देऊ नका. जर तुम्हाला सिनिअर्स जास्त काम देत असतील तर तुम्ही आधीच ओव्हर बर्डन असल्याचं त्यांना सांगा.4 / 7ऑफिस ब्रेक किंवा लंच टाईमच्या वेळी कामाबद्दल बोलू नका. हा वेळेत तुम्ही मित्र मैत्रिणींशी वेगळ्या विषयावर गप्पा मारू शकता. स्क्रीपासून थोडावेळ लांब राहा.5 / 7 कामादरम्यान कोणाचीही मदत घेण्यास संकोच करू नका. खूप लोकांना काही गोष्टी येत नसतात. अशावेळी कॅपेबलिटीचा प्रश्न आहे, असं वाटून न घेता इतरांची मदत घ्या6 / 7 कामावर असताना खुर्चीवर तासनतास बसून राहिल्यास, तुम्हाला पाठदुखी होऊ शकते आणि ताण वाढू शकतो म्हणूनच कामादरम्यान उठून स्ट्रेचिंग करा किंवा वॉक करा7 / 7संगीत ऐकणे अनेक फायदे देते आणि कामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर तणाव कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. काम करत असताना शक्य झाल्यास आवडती गाणी लावल्यानं मूड फ्रेश राहण्यास मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications