भाजी पोळी नकोच, मुले सतत जंकफूड मागतात? १० सोपे उपाय, जंकफूड विसरुन जातील मुले...
Updated:March 14, 2025 12:27 IST2025-03-14T00:16:28+5:302025-03-14T12:27:37+5:30
Healthy Eating Habits For Kids : How to stop children from eating junk food : How can avoid junk food habits in our kids : 10 Tips To Keep Your Kids Away From Junk Food : मुलं सारखं जंकफूड खाण्यासाठी हट्ट करतात, ही सवय मोडण्यासाठी पालकांनी करावेत असे सोपे उपाय...

मुलं वारंवार घरची पोळी - भाजी किंवा इतर पौष्टिक अन्नपदार्थ खायचे सोडून जंकफूड (10 Tips To Keep Your Kids Away From Junk Food ) मागतात, अशी अनेक आई - वडिलांची तक्रार असते. अशावेळी नेमकं करायचं काय या विचाराने ( How to stop children from eating junk food) पालक गोंधळून गेलेले असतात. मुलांची जंकफूड खाण्याची सवय (Healthy Eating Habits For Kids) सोडवण्यासाठी आई वडिलांनी करावेत असे काही सोपे उपाय पाहूयात.
१. घरात चिप्स, बिस्किटे, चॉकलेट असले पदार्थ लहान मुलांच्या लगेच हाताला लागतील असे हातासरशी ठेवू नयेत.
२. मुलांच्या हाताला लागतील लगेच घेता येतील असे पदार्थ जसे की, चिक्की, मखाणे, ड्रायफ्रुटस, फळे जवळपास ठेवावीत.
३. योग्य वेळी जेवण मिळाल्यास मुलांना वारंवार जंक फूड खाण्याची गरज वाटणार नाही. मुलांना जेवणाच्या वेळी जेवण आणि स्नॅक्स टाईमच्या वेळी स्नॅक्स खायला शिकवा.
४. घरात केले जाणारे पदार्थच आकर्षक बनवा. रंगीबेरंगी फळे, भाज्या, आणि पोषणयुक्त पदार्थांपासून चविष्ट आणि रंगीबेरंगी पदार्थ तयार करा.
५. जंक फूड घरी आणू नका. घरीच पौष्टिक पदार्थ बनवा, त्यामुळे मुलांना सहज आरोग्यदायी पर्याय मिळतील आणि ते जंक फूड खाण सोडून देतील.
६. घरच्याघरीच मुलांना चमचमीत पण पौष्टिक पदार्थ खायला द्या. जसे की घरचे पिठले, पनीर टिक्का, मखाणा भेल, भिजवलेली चणे-मटकी चाट, भाज्यांचा उत्तप्पा.
७. जाहिरातींमध्ये दाखवलेले जंक फूड आकर्षक वाटते, त्यापेक्षा मुलांना आरोग्यदायी पदार्थांची महत्त्वाची माहिती द्या.
८. जंक फूडमुळे होणारे नुकसान आणि आरोग्यदायी अन्नाचे फायदे सोप्या भाषेत मुलांना समजवा.
९. मुलांसाठी तुम्ही स्वतः आधी रोल मॉडेल बना. तुम्ही स्वतः हेल्दी खाल्लं तरच मुलं ते आत्मसात करतील.
१०. मुलांना स्वयंपाकात सहभागी करा. मुलांना हेल्दी पदार्थ बनवताना मदत करू द्या, त्यांना ते अधिक आवडेल व स्वतः बनवलेले हेल्दी पदार्थ खाण्याची सवय लागेल.