Join us   

पालकांकडून नकळत होणाऱ्या ३ गोष्टींमुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो, बघा तुमचंही तेच चुकतंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 3:31 PM

1 / 6
मुलांमध्ये कॉन्फिडन्स असणं किंवा नसणं या गोष्टी त्यांच्या सभोवतालचं वातावरण कसं आहे, त्यांना कशी वागणूक मिळते यावर अवलंबून असतं.
2 / 6
बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला मुलांमध्ये चांगला कॉन्फिडन्स असतो, पण हळूहळू तो कमी होत जातो. ते चारचौघांत बोलायला बुजतात. तुमच्याही मुलांचं असंच झालं असेल तर पालकांनी नकळतपणे केलेल्या काही चुका त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
3 / 6
पालकांच्या कोणत्या सवयींमुळे मुलांचा कॉन्फिडन्स किंवा स्वत:वरचा विश्वास कमी होतो, याविषयीचा एक व्हिडिओ vishruti_joyes_parenting या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
4 / 6
त्यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर पालक मुलांवर विश्वास ठेवत नसतील तर मुलांचा कॉन्फिडन्स आपोआप कमी होत जातो. त्यामुळे मुलांवर विश्वास ठेवा, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला आहे.
5 / 6
दुसरी गोष्ट म्हणजे जर मुलांचे दोन्ही पालक किंवा दोघांपैकी एक जण जरी खूप जास्त परफेक्शनिस्ट असेल तरी त्याचा सुरुवातीला मुलांना त्रास होतो. कारण अमूक एक गोष्ट अशाच पद्धतीने झाली पाहिजे असा पालकांचा आग्रह असतो. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलांनी ती केली नाही तर त्यांची चिडचिड होते. अशावेळी पालक मुलांचं वय लक्षात न घेता त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवतात. त्या पुर्ण करता आल्या नाही की आपोआपच मुलं खचत जातात.
6 / 6
मुलांचा कॉन्फिडन्स कमी करणारी तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची सतत इतरांशी तुलना केली जाणे. जर पालक असं वारंवार करत असतील आणि तुलना करून मुलांना कायम त्यांचा कमीपणाच दाखवून देत असतील तर मुलांच्या मनात तीच भावना वाढू लागते आणि ते स्वत:ला कमी समजू लागतात.
टॅग्स : Shalechi Taiyariलहान मुलंपालकत्व