मुलांचं वजन वाढतच नाही? डॉक्टर सांगतात ४ उपाय- थोडंस खाऊनही मिळेल भरपूर एनर्जी
Updated:April 2, 2025 13:26 IST2025-04-02T13:20:32+5:302025-04-02T13:26:05+5:30

बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की मुलांचं वजन अजिबात वाढत नाही. मुलं व्यवस्थित जेवणसुद्धा करत नाहीत. त्यामुळे मग ते खूपच बारीक दिसतात.(4 foods for weight gain in kids)
अशीच तक्रार तुमचीही असेल तर डॉक्टरांनी सांगितलेले हे काही उपाय लगेचच करून पाहा. डॉक्टरांनी याविषयीची माहिती dr_kiranphadtare_gharg या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगत आहेत की मुलांचं पोट छोटंसं असतं. त्यामुळे त्यांची भूकही कमीच असते (Weight Gain Foods for Kids). म्हणूनच त्यांना असे पदार्थ द्यावेत जे त्यांनी कमी प्रमाणात खाल्ले तरी त्यातून त्यांना भरपूर उर्जा मिळेल.(Healthy Weight Gaining Foods For Kids)
मुलांच्या शरीरात हेल्दी फॅट्स जाणं गरजेचं असतं. त्यामुळे मुलांसाठी तुम्ही ज्या रेसिपी कराल त्यामध्ये तूप, लोणी किंवा नारळाचा किस या तीनपैकी एखादा पदार्थ तरी आवर्जून घालाच. यामुळे त्यांना भरपूर एनर्जी मिळेल.
मुलांना पनीर, टोफू असे पदार्थ खाऊ घाला. कारण या पदार्थांमधून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅलरी मिळतात.
मुलांना चिकू, केळी, अव्हाकॅडो, आंबा, पपई अशी फळं नियमितपणे खायला द्या. या पदार्थांमधूनही भरपूर कॅलरी मिळतात आणि वजन वाढायला मदत होते.
मुलांना वेगवेगळ्या रेसिपींमधून शेंगदाण्याचा कूट किंवा सुकामेव्याची पावडर खाऊ घाला. यातूनही त्यांना चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स, कॅलरी मिळतात आणि वजन वाढायला मदत होते.