Join us   

मेंदूला नेहमीच ॲक्टीव्ह ठेवणाऱ्या ५ गोष्टी! तुम्हीही करा- मुलांनाही करायला लावा, बुद्धिमत्ता- एकाग्रता वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 3:22 PM

1 / 7
तुमचा मेंदू नेहमीच तल्लख असावा, वयस्कर झालात तरी विस्मरणाचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टी आपण अगदी आवर्जून केल्याच पाहिजेत.
2 / 7
एवढंच नाही तर घरातल्या लहान मुलांकडूनही त्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. कारण यामुळे त्यांच्याही मेंदूला चालना मिळते. शिवाय एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढण्यासाठीही त्याचा फायदा होतो. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या त्या बघा... (5 activities that helps to improve memory and creativity)
3 / 7
आपण सतत काहीतरी नविन करायला शिकलं पाहिजे. मग ते अगदी स्वयंपाकातला एखादा पदार्थ असू दे किंवा मग जगभरातल्या ट्रेडिंग गोष्टींमागचं तंत्रज्ञान असू दे.. तुम्हाला जे आवडेल ते शिका, पण काहीतरी नविन नेहमी शिकत राहा.. (important brain exercise for every students)
4 / 7
कोणतंही वाद्य शिकणं किंवा गायन, नृत्य शिकणं हे देखील आपल्या मेंदूसाठी आपल्या मानसिक विकासासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. असं म्हणतात की गायन, वादन, नृत्य या कला शिकत गेल्यामुळे आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा असे दोन्ही भाग विकसित होत जातात. तुमच्या मुलांनाही त्यांना जी आवडेल ती कला आवर्जून शिकवा.
5 / 7
एखादी नवी भाषा शिका. त्या भाषेतले शब्द माहिती करून घेताना, तिच्यातले बारकावे शिकून घेताना आपल्यातली एकाग्रता वाढत जाते. शब्दसंग्रह वाढतो.
6 / 7
कोणता ना कोणता व्यायाम दररोज नेमाने करा. तुम्हाला जो व्यायाम प्रकार आवडेल तो निवडा. कारण मेंदूच्या विकासासाठी तुम्ही शारिरीकदृष्ट्या फिट असणं गरजेचंच आहे.
7 / 7
एखादा खेळ शिकल्याने किंवा दररोज खेळल्यानेही आपला मेंदू ॲक्टीव्ह राहण्यास, आपल्यातली क्रियेटीव्हीटी वाढण्यास मदत होते, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपने प्रसिद्ध केली आहे.
टॅग्स : पालकत्वलहान मुलंव्यायाम